Kasba By-Election Results : कसब्यात 'नोटा'ला चौदाशे मतदारांची पसंती; ब्राह्मण समाजाची नाराजी दिसली नाही!

Kasba By-Electin Results : अनेक मतदारांनी मतदान टाळले?
Kasba By-Electin Results :
Kasba By-Electin Results :Sarkarnama

Kasba By-Electin Results : भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला. धंगेकर यांना ७३१९४ मते मिळाली. तर रासनेंना ६२२४४ मते मिळाली, तर १४०१ मते तिसऱ्या क्रमांकावर नोटाची मते मिळाली.

Kasba By-Electin Results :
Nagaland Election Results : नागालँडमध्ये राष्ट्रवादीची हवा; ७ जागांवर दणदणीत विजय

कसबा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर कसबा पेठ पोटनिवडणुकीत उमेदवारी टिळक कुंटुंबातच मिळणार अशी सुरूवातीपासून चर्चा होती. मात्र राजकीय गणितं, सामाजिक समीकरण आणि प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा धांडोळा घेता, भाजपने ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी देत, हेमंत रासनेंना मैदानात उतरवले. भाजपच्या या निर्णयामुळे सुरूवातीला टिळक कुटुंबाची नाराजी असल्याची चर्चा झालीयामुळे नाराज झालेला ब्राह्मण समाजचा राग हा नोटाचा बटण दाबून व्यक्त होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात होती.

Kasba By-Electin Results :
By Election Results : काँग्रेसला 'अच्छे दिन' : चार राज्यातल्या पोटनिवडणुकीत भाजपला अवघी एकच जागा!

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांनी माध्यमांसमोर उघड नाराजी ही व्यक्त केली. यानंतर मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज असल्याचे निनावी फलक लावले गेले. यामुळे ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असून, या नाराजीचा परिणाम मतदानावर उमटणार, अशा प्रतिक्रिया येत होत्या.

याचा परिणाम म्हणून कसब्यात नोटाला विक्रमी मते मिळतील, अशी शक्यता बोलवून दाखवली जात होती. मात्र प्रत्यक्षात नोटाला अवघे १४०० मते मिळाली. एकूण मतदानाच्या अवघे एक टक्के मते नोटाली मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in