Prashant Jagtap : Sainath Babar
Prashant Jagtap : Sainath BabarSarkarnama

Kasba By-Election : कसब्यात मनसे-राष्ट्रवादीमध्ये जोरदार जुंपली : 'ट्विटर वॉर' सुरूच..

Prashant Jagtap : "तुझ्या सायबाने सुपारी घेतली, तू नाचायचं काम कर..."

Kasba By-Election : पुण्यात पोटनिवडणुक ऐन रंगात असताना आणि मनसेने या निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर या दोघांमध्ये ट्विटयुद्ध सुरू झाले आहे.

कसब्याच्या पोटनिवडणुकीत मनसेने नुकतीच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर प्रशांत जगताप यांनी या मुद्द्यावरून मनसेला लक्ष्य केले होते. जगताप ट्विट करत म्हणाले की, "कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहेत. बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत. नवनिर्माण म्हणे.." अशा आशयाचे ट्विट जगतापांनी केले होतं.

Prashant Jagtap : Sainath Babar
Balasaheb Thorat : कथित नाराजीपत्रावर थोरात म्हणाले, 'अरे.. अरे.. मी कधी नाराज...'

दरम्यान, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती.महाविकास आघाडीने कॉंग्रेसला रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. मात्र राष्ट्रवादीला उमेदवारी न दिल्याने बाबर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती.

Prashant Jagtap : Sainath Babar
Congress News : "आम्ही चव्हाणांना जबरदस्ती करू..." ; केदारांचं वक्तव्य : प्रदेशाध्यक्षापदावरून काँग्रेस घमासान?

मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने यावर बोचरी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रशांत जगताप यांनी ही टीका केली होती. "साहेब किती दिवस तुम्ही दुसऱ्यांच्या वरातीत सुपारी घेऊन नाचणार ? कधीतरी तुम्हीही घोड्यावर बसा. - एक निराश मंदसैनिक" अशा आशयाचं ट्विट जगतापांनी पुन्हा केली होती. यामुळे कसब्यात राष्ट्रवादी - मनसे यांच्यातजोरदार जुंपली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com