Kasba By-Election : एक्झिट पोलचा अंदाज धुडकावत हेमंत रासने म्हणाले, 'गुलाल मीच उधळणार..'

Kasba By-election : "25 ते 30 हजार मतांची लीड घेऊन निवडून येणार.."
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant RasaneSarkarnama

Kasba By-Election : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या २ मार्च रोजी निकाल येणार आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजप विरूद्ध महाविकास आघाडी यांची थेट लढत आहे. दरम्यान काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेच्या एक्झिट पोलनुसार कसबामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवडमध्ये भाजपच्याअश्विनी जगताप (Ashwini Jagtap) निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आपणच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Pune Bypoll News : कसब्याचा निकाल लवकर, तर चिंचवडचा अधिकृत अंतिम निकाल यायला वाजणार रात्रीचे दहा..

हेमंत रासने म्हणाले की, "मागील १५-२० दिवस निवडणुकीत आम्ही जोरदार प्रचार केला आहे. आमची भाजप - शिवसेना - आरपीआय व घटक पक्षांची युती मतदारसंघात कार्यरत होती. आम्ही इथल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्राची व राज्य सरकारची विकासाम आम्ही शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्र आणि राज्य सरकार विकासकामे पाहून इथली जनतेचा आशिर्वाद आम्हालाच मिळणार आहे. "

रासने पुढे म्हणाले, "चांगलं मताधिक्य मला मिळेल. साधारण 25-30 हजारांचे मताधिक्याने माझा विजय होईल. आम्ही बूथपर्यंत पोहचून कामाला सुरूवात केली होती. कोणत्या भागात किती मतदान झाले, आमच्या पारंपरिक मतरांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले आहे. विजयाचे बॅनर लागल्याने, अनेकांचे फोन सुरू झाले होते. मात्र जेव्हा निकाल जाहीर होईल, तेव्हाच बॅनर लावायला हवेत."

Kasba By-election : Ravindra Dhangekar : Hemant Rasane
Kasba and Chinchwad By-Election : एक्झिट पोलमध्ये धंगेकर अन् जगतापांना पसंती

कसब्यात काय होणार ?

स्ट्रेलिमा या संस्थेच्या सर्व्हेनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा 15 हजार मताधिक्यांनी विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेमंत रासने यांना 59 हजाराच्या आसपास तर रविंद्र धंगेकर यांना 74 हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in