Kasba By-Election : दगडूशेठ मंडळाच्या गोडसे परिवाराचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा

Dagdusheth Mandal supports Ravindra Dhangekar: धंगेकरांचे राजकीय पारडे जड ?
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Kasba By-Election : कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराचा अंतिम आठवडा राहिल्यामुळे उमेदवारांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे यांच्या गोडसे परिवाराचा महाविकास आघाडीचे पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekr) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. धंगेकर यांच्या कडून अक्षय गोडसे (Akshay Godase) यांनी गोडसे परिवाराचा आपल्याला पाठिंबा असल्याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे आता धंगेकर यांना या लढाईत मोठे बळ मिळल्याची चर्चा आहे.

अक्षय गोडसे व्हिडीओच्या माध्यमातून धंगेकरांना पाठिंबा देताना म्हणाले, "रवी भाऊ आणि आमच्या गोडसे परिवाराचं गेल्या अनेक वर्षाचं नातं आहे . माझे आजोबा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक दिवंगत तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोकभाऊ गोडसे ते माझ्यापर्यंत स्नेहाचं आणि अत्यंत चांगलं नातं आहे. मला चांगलं आठवतं, तात्यासाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला रवीभाऊ जवळ-जवळएक हजार भगवद्गीतेचे पुस्तक त्यांच्या वार्डात नागरिकांना वाटप करायचे. "

Ravindra Dhangekar
Gadchiroli : नक्षलवाद्यांची कोंडी करून विविध कारवाया सुरू, त्यांना स्थानिकांचा आधार नाही !

ते पुढे म्हणाले,"गेली अनेक वर्षे ते आमच्या घरी येतात. अनेक वर्षे त्यांचे आणि अशोक भाऊंचे चांगले संबंध आहेत. अशोक भाऊंच्या वाढदिवसाला देखील, आमच्या घराखाली रांगोळी काढण्यापासून ते भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंत,सगळी जबाबदारी रवी भाऊ घरातला संबंध असल्यासारखे घ्यायचे. आमच्या परिवारीशी त्यांचा चांगला सलोखा आहे. आमच्या गोडसे परिवाराचं त्यांना या निवडणुकीत पाठबळ आहे. त्यांना पुढच्या भावी वाटचाली निमित्त त्यांना माझ्याकडून व गोडसे परिवाराकडून शुभेच्छा देतो," असे ही गोडसे म्हणाले आहेत.

Ravindra Dhangekar
Shivsena : 'तुमच्या फालतुगिरीमुळेच उद्धव ठाकरेंना रस्त्यावर यायची वेळ' : भाजप आमदाराचा राऊंतावर हल्लाबोल

आता दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे यांच्या गोडसे परिवाराने रवींद्र धंगेकरांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांचे या निवडणुकीच राजकीय पारडं जड झाल्याची चर्चा आहे. मात्र याचा मतदानावर कसा परिणाम होतो, हे ही पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in