Kasba By-Election : अखेर हिंदू महासंघ कसब्याच्या रिंगणात ; आनंद दवेंनी भरला अर्ज!

Kasba By-Election : कसब्यातून अखेर आनंद दवे रिंगणात..
Kasba By-Election Anand Dave
Kasba By-Election Anand DaveSarkarnama

Kasba By-Election : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय नाट्य घडून येत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अपेक्षेप्रमाणे हिंदू महासंघाकडून आनंद दवे (Anad Dave) यांनी अर्ज दाखल केला आहे.

भाजपकडून ब्राह्मण समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप हिंदू महासंघाने केला होता. यामुळे त्यांना पोटनिवडणूक लढवण्यचा निर्णय घेतला. आनंद दवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह सावरकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून अखेर निवडणूक अर्ज दाखल केला.

हिंदू महासंघकडून शक्ती प्रदर्शनन करण्यात आलं. यावेळी दवे यांचे अनेक कार्यकर्ते हजर होते. हातात भगवा झेंडा त्यांनी घेतला होता. यावेळी दिवंगत मुक्ता टिळक यांचा फोटो घेत शक्तीप्रदर्शन त्यांना केलं. यावेळी हिंदुत्वाच्या घोषणा देखील देण्यात आले. घोषणाबाजीदेखील करण्यात आली. सारसबागेतील तळ्यातल्या गणपतीचं दवेंनी दर्शन घेतलं. यानंतर दवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Kasba By-Election Anand Dave
Chandrapur : औषधे असतानाही बाहेरून का आणायला लावता, आमदार जोरगेवार संतापले...

खुल्या प्रवर्गाचा बुलंद आवाज विधानसभेत दाखव व्हावा, पुणेश्वराला मुक्त करायचे आहे. तसेच स्वच्छ व सुंदर कसबा इत्यादी ते दवे यांनी म्हंटले होते. यापूर्वी दवे यांनी म्हंटले होते की, "भाजपला फक्त जातींची मिळवायची असतात. टिळक घरात उमेदवारी न दिल्यामुळे खुल्या गटाची कुचंबणा होत आहे. सर्वच जातींना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे, याच भावनेतून मिळालं पाहिजे याच भावनेतून आम्ही हिंदू महासंघ निवडणूक लढवत आहोत."

कसब्याची लढत अत्यंत चुरशीची आहे. लोकांकडून जेव्हा भाजप पक्षाची टिंगल उडवत होते, त्यावेळी भाजपला वाढण्यासाठी केवळ ब्राह्मणांनी साथ दिलेली आहे. आता याच समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजपकडून होत आहे.कोथरुड नंतर आता कसब्यातसुद्धा अशीच स्थिती आहे.

Kasba By-Election Anand Dave
Chinchwad By-Election : कलाटेंच्या बंडखोरीवर अजितदादा म्हणाले, "ऐकायचं की नाही..."

एकीकडे जगताप कुटुंबाला चिंचवड मतदारसंघात भाजपने न्याय दिला. तोच न्याय मात्र टिळकांच्या घरात दिला गेला नाही, असे दवे म्हणाले. पुणे जिल्ह्यात 21 आमदार आहेत. प्रत्येक समाजाचं आपापलं प्रतिनिधित्व आहेत, मात्र ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधित्वाला का डावल्यण्यात येतो, असा सवाल दवेंनी केला.

ब्राह्मण समाजाने मागणी केल्यानंतरच, हिंदू महासंघकडून मी स्वत: कसभ्याच्या निवडणुकीत उतरलो आहे. आता भाजपला आता हा धोका आहे. हिंदू महासंघाचा उमेदवारच इथे निवडून दिला जाणार, असा आपल्याला विश्वास असल्याचे दवेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com