Kasba By-Election : निकालाआधीच विजयाचा दावा : धंगेकर-रासनेंच्या कार्यकर्त्यांची फ्लेक्सबाजी!

Kasba By-Election : निकालाच्या दिवशी कोणाचा फ्लेक्स उतरणार खाली?
Kasba By-Election :  Ravindra Dhangekkar : Hemant Rasane
Kasba By-Election : Ravindra Dhangekkar : Hemant RasaneSarkarnama

Kasba By-Election : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात ही मुख्य लढत आहे. मतदानानंतर निकाल २ मार्च रोजी जाहीर होणार आहेत. मात्र निकालाआधीच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. यामुळे पुण्यात एकच चर्चा सुरू झाली आहे.

Kasba By-Election :  Ravindra Dhangekkar : Hemant Rasane
Budget Session : गळ्यात कांदा-कापसाच्या माळा : भाव नाही मिळाला तर कांद्यासारखं सोलून काढू; विरोधक आक्रमक !

रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याच्या आशयाचे होर्डींग्स पुण्यात लावण्यात आलेले दिसून आले होते. आता भाजपचे हेमंत रासने यांचा विजयाचा दावा करणारा होर्डींग लावण्यात आला आहे. निकाला आधीच विजयाचा दावा केल्याने, आता सोशल मीडीयावर एकच चर्चा होत आहे. निकालाआधीज अतिउत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचा दावा करत फ्लेक्सबाजी केली आहे.

Kasba By-Election :  Ravindra Dhangekkar : Hemant Rasane
Kasba Peth By Election : प्रभाग १५ मधील घटलेल्या मतदानाने भाजपची चिंता वाढवली...

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रविवारी मतदान पार पडले. २ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडून आले. भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापले पक्ष आणि उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला. लढत अतिशय चुरशीची असल्यामुळे निकालाआधीच विजयाचा दावा करणे कठीण असताना, विजयाचा दावा करत होर्डिंग्जबाजी सुरू झाल्याने, आता चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com