Kasba By-Election : कसब्यात तब्बल २१ उमेदवारांनी ठोकला शड्डू : रासने, धंगेकर, दाभेकर, बीचुकले, दवे रिंगणात!

Kasba By-Election : अपक्ष उमेदवारही आहेत ताकदवान!
Kasba By-Election :
Kasba By-Election :Sarkarnama

Kasba By-Election : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकी भोवती अनेक राजकीय नाट्य घडताना दिसून येत आहे. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या या प्रस्तावाला महाविकास आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अखेर भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांचं नाव जाहीर केले. यानंतर आप, संभाजी ब्रिगेड, ब्राह्मण महासंघ, मराठा सेना इत्यादी पक्ष आणि अपक्ष असे मिळून कसब्यात तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे.

भाजपचे हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेसकडून इच्छुक असलेले बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत, अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर टिळक कुटुंबिय व ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्याने हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच बिग बॉस फेम व कवि मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी ही अपक्ष अर्ज भरला आहे. यासोबतच इतर छोटे मोठे पक्ष व अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीआता २१ उमेदवार रिंगणात आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयात उमेदवाऱ्यांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. निवडणूक अधिकारी यांनी आज सर्व कागदपत्रे आणि अर्जाची केली छाननी केली आहे. कसबा विधानसभेसाठी एकूण २९ उमेदवारांनी भरले होते, यापैकी आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले.

21 उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे ;

हेमंत रासने - भाजप

रवींद्र धंगेकर - महाविकास आघाडी

अविनाश मोहिते - संभाजी ब्रिगेड पार्टी

किरण कद्रे - आम आदमी पार्टी

तुकाराम डफळ - सैनिक समाज पार्टी

बलजितसिंग कोचर - प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी

मिलिंद कांबळे - अखिल भारतीय सेना

रवींद्र वेदपाठक - राष्ट्रीय मराठा सेना

अपक्ष उमेदवार:

अजित इंगळे, अनिल हतागले, अभिजीत बिचुकले, अमोल तुजारे, आनंद दवे (हिंदू महासंघ), खिसाल जाफरी, चंद्रकांत मोटे, बाळासाहेब दाभेकर, रियाज सय्यद, सलीम सय्यद, सुरेशकुमार ओसवाल, संतोष चौधरी, हुसेन शेख.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com