Kasba By election : कसब्याच्या निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त ; नऊ मतदान केंद्र संवेदनशील

Kasba By election : आता उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू झाला आहे.
Kasba By Election news update
Kasba By Election news updateSarkarnama

Kasba By election : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या (रविवारी) मतदान होणार आहे.

पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. काँग्रेसने व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली. नेत्यांच्या भाषणाच्या तोफा थंडावल्या आहेत. आता उमेदवारांकडून छुपा प्रचार सुरू झाला आहे.

Kasba By Election news update
Kasba By election : धंगेकरांचा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप; शनिवारी सकाळी उपोषणाला बसणार

शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात

कसबा मतदारसंघात आजपासून (ता. २५) चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी शहर पोलिस दलातील ११०० पोलिस अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) ५०० जवान आणि राज्य राखीव पोलिस दलातील १०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात राहणार आहेत.

१७०० पोलिसांचा बंदोबस्त

मतदानाच्या दिवशी कसबा मतदारसंघात १७०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. कसबा मतदारसंघात शहर पोलिस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

७६ मतदान केंद्रांवरील २७० बूथवर मतदान

समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक आणि दत्तवाडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही पोटनिवडणूक होत आहे. ७६ मतदान केंद्रांवरील २७० बूथवर मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीत नऊ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, खाद्यपदार्थ गाड्या, टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कसब्यात ३२ लाखांची रोकड जप्त

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार ७८९ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांकडून ११९ शस्त्रे जप्त केली. पोलिसांनी ३३ हजार ७८५ रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्याचे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.कसबा पोटनिवडणुकीदरम्यान पोलिसांनी १३ हजार ५४२ वाहनांची तपासणी केली. भरारी पथकांनी नाकाबंदीत ३२ लाख १८ हजार रुपये जप्त केले आहेत. ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com