Kasaba Peth By Election : कसब्यात हाय होल्टेज ड्रामा : राष्ट्रवादीकडून १२ इच्छुकांची नावे जाहीर!

Kasaba By Election : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा कसब्यावर दावा!
Kasaba By Election :
Kasaba By Election : Sarkarnama

पुणे : कसबा पोटनिवडणुकीला आता वेगवेगळे वळण येत आहेत. एकीकडे भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होत असताना, महाविकास आघाडीतील पक्षांकडून ही जागासाठी, आता दावा करण्यात येत आहे. काँग्रेसकडून यासाठी तब्बल सोळा इच्छुकांची नावे जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादीकडूनही बारा इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे कसब्यात मोठे राजकीय घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुकांची नावे जाहीर झाली आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. याबाबत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत कसब्याची जागा लढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Kasaba By Election :
Kasba By Election : 'कसबा' बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली; आमदार मिसाळांकडे दिली मोठी जबाबदारी

कसबा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे माहविकास आघाडीतील इतर पक्षातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसून येत नाही, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांकडून धरला गेला होता. त्यानुसारच आजच्या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवण्याचा निर्णय झाला.

Kasaba By Election :
Chinchwad By Election : 'आमदार जगताप हयात असतानाच भाजपची सुरू होती निवडणुकीची तयारी!'

राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छुकांची यादी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली ठोंबरे पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावांसह एकूण 10 इच्छुकांची नावे प्रदेशाकडे पाठवणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com