Kasaba By-Election : कसब्यात निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच; काँग्रेसकडून पाच संभाव्य नावे निश्चित!

Kasaba By-Election : भाजपने टिळक यांना उमेदवारी दिली तरी काँग्रेस लढणारच!
Kasaba By-Election :
Kasaba By-Election : Sarkarnama

Kasaba By-Election : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा ( Kasba Peth Assembly Constituency) पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे. काँग्रेसकडून या निवडणूक लढविली जाणार असे संकेत यापूर्वीच मिळाले होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली होती. याबाबत आता काँग्रेसच्या गोटातून मोठी माहिती येत आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काँग्रेस लढण्याची जोरदार तयारी करीत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. काँग्रेसच्या वतीने प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, माझी महापौर कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर आणि संगीता तिवारी ही नाव उमेदवारीसाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात येणार आहेत. या पाच नावांमधूनच प्रदेश काँग्रेसच्या वतीने एक नाव निश्चित करण्यात येणार आहे. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर महिनाभरातच निवडणूक होत आहे.

Kasaba By-Election :
Kasba Constituency : कसब्यात भाजपाचा उमेदवार ठरल्यानंतरच कॉंग्रेसचे ठरणार; निवडणूक लढण्यासाठी शिवसेना आग्रही

कसबा विधानसभेची ही निवडणूक टिळक कुटुंबातील शैलेश टिळक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली तर बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता टिळक यांना उमेदवारी दिली तरी काँग्रेस ही जागा लढणारच, असं जवळपास निश्चित झालं असल्याचं काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

Kasaba By-Election :
Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणुकीत 'आप'ची उडी ; बिनविरोध होण्याच्या शक्यता मावळल्या?

या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम थोपटे यांची निरीक्षक म्हणून प्रदेश काँग्रेसच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. ही पाच नाव थोपटे यांच्याकडे देण्यात येणार असून, यासंदर्भात उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ते भेट घेणार असल्याचे, काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com