ॲट्रॉसिटी गुन्ह्याअंतर्गत करुणा शर्मांना अटक

Karuna Sharma : येरवडा पोलीस ठाण्यात करुणा शर्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Karuna Sharma Latest News
Karuna Sharma Latest NewsSarkarnama

पुणे : महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेवर दबाव टाकल्या प्रकरणी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यासह त्यांचे स्वीयसहायक यांना येरवडा पोलिसांकडून मुंबईतून अटक करण्यात आली आहे. करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही काही महिन्यांपूर्वी आरोप केले होते. त्यावेळी त्या प्रकाशात आल्या होत्या.

Karuna Sharma Latest News
एकनाथ शिंदे अजितदादांपेक्षा वजनदार निघाले; ३५ आमदार घेवून बाहेर पडले...

याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात काल फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार तिने आपल्या पती विरोधात अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करुणा शर्मा या सहआरोपी आहेत.

Karuna Sharma Latest News
नवनीत राणांनी पुन्हा वाचली हनुमान चालिसा अन् म्हणाल्या, उद्धव ठाकरेंची उलटी गणती सुरू

या तरुणीच्या पतीला घटस्फोट हवा होता. करुणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो आपल्या पत्नीवर दबाब टाकत होता. पती आणि शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचबरोबर शर्माने हॉकीस्टीकने मारहाण करण्याचीही धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याचबरोबर पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचेही तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Karuna Sharma Latest News
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी काल येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने शर्मा आणि त्यांच्या स्वीयसहायकाला सोमवारी (20 जून) रात्री मुंबईत ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना मंगळवारी (ता.21 जून) अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com