Siddaramaiah On Sharad Pawar: मुख्यमंत्री सिद्धरामय्या शरद पवारांना म्हणाले, महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवा...

Political News: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.
Siddaramaiah
Siddaramaiah Sarkarnama

Baramati News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने सांगलीत महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बारामतीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी विकास प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी "महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवा", असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते म्हणाले. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आलं. आता महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न राबण्याबाबत सिद्धरामय्यांनी आघाडीच्या नेत्यांना सुचवलं आहे.

Siddaramaiah
Ajit Pawar on Medical College: कॉलेजच्या नामकरणावेळी बारामतीकरांना बरोबर घ्यायला हवं होतं; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

सिद्धरामय्या म्हणाले, "आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता नक्की येईल. महिलांना मोफत बस प्रवास, तसेच प्रत्येक कुटुंब प्रमुख महिलेला महिन्याला दोन हजार रुपये देण्याची कर्नाटक राज्याची योजना महाराष्ट्रात देखील राबवली गेली पाहिजे, कर्नाटक पॅटर्न निवडणुकीपूर्वीच राबवा, त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल", असा एक प्रकारे सल्लाच आघाडीच्या नेत्यांना सिद्धरामय्या यांनी यावेळी दिला.

अहिल्यादेवी होळकर यांनी महिलांचे सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव सिद्धरामय्या यांनी केला. महिलांचा आर्थिक व शैक्षणिक विकास होत नाही, तो पर्यंत समाज प्रगती करु शकत नाही, त्यामुळे कर्नाटकमध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर सरकारने भर दिला आहे, असंही यावेळी सिद्धरामय्या यांनी सांगितलं.

Siddaramaiah
Sangola News : सराफ व्यावसायिकांच्या मदतीला धावले बाबासाहेब देशमुख : थेट कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

दरम्यान, यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणावरून केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, "केंद्र सरकारला धनगर व धनगड एकच आहे, असे सांगून थकले. पण, आम्ही आमचे आरक्षण कमी करणार नाही, ही दिल्लीतील भाजपची भूमिका आहे. राज्यात एक व केंद्रात एक अशी दुहेरी भूमिका भाजप घेत आहे. मात्र, आम्ही आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही", असं त्या म्हणाल्या.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com