पुणे पोलिसांनी आवळल्या कालीचरण बाबाच्या मुसक्या

पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात कालीचरण बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. खडक पोलिस त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Kalicharan Baba in the custody of Pune Police

Kalicharan Baba in the custody of Pune Police

sarkarnama

पुणे : अकोल्यातील मूळ रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज (kalicharan baba) याने रायपूर येथे आयोजित धर्मसंसद मध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. संपूर्ण देशात याचे पडसाद उमटले. त्याला मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातून अटक करण्यात आली होती.(Kalicharan Baba News Updates)

कालीचरण बाबा सध्या छत्तीसगढमधील रायपूर पोलिसांच्या ताब्यात होता. आज पुणे पोलिसांनी (Pune Police) त्याला रायपूर येथे ताब्यात घेतले आहे. पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात कालीचरण बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. खडक पोलिस त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Kalicharan Baba in the custody of Pune Police)

कालीचरण बाबाने महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरुन राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे. कालीचरण बाबाला तीस डिसेंबर रोजी पहाटे मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातून अटक करण्यात आली होती. अकोल्यात काँग्रेसच्या आंदोलनानंतर कालीचरण बाबावर कोतवाली पोलिसांनी भांदवीच्या कलम 294 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणी कालीचरण महाराजाच्या वतीने अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयात पार पडल्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने कालीचरण महाराज यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. यावेळी वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि नथुराम गोडसेचे कौतुक केलं. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनीही महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरले असल्याने संताप व्यक्त होत आहे.

<div class="paragraphs"><p>Kalicharan Baba in the custody of Pune Police</p></div>
राज्यातील १३ मंत्री, ७० आमदारांना कोरोना

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन गदारोळ माजला होता. रा्ष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्वीट केलं असून अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com