Congress
Congresssarkarnama

नरेंद्र मोदींनी भांडवलदारांना रेड कार्पेट टाकून जनतेला उध्वस्त करणारी धोरणे अवलंबिली!

महागाई आणि बेरोजगारीने जनता होरपळली असताना केंद्र सरकार मात्र 'कुंभकर्णी' झोपेचे सोंग घेत आहे.

पिंपरी : केंद्रातील भाजप सरकारने निर्माण केलेली कृत्रिम महागाई, भ्रष्टाचार, शेतकरी कामगारांवर लादलेले अन्यायकारक कायदे व इतर अन्यायकारक धोरणांविरोधात कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आदेशाने १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (ता.१४) नेहरुनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी भाजपवर सडकून टीका केली.

Congress
पीएमआरडीए निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपपेक्षा अधिक मते!

महागाई आणि बेरोजगारीने जनता होरपळली असताना केंद्र सरकार मात्र 'कुंभकर्णी' झोपेचे सोंग घेत आहे. सात वर्षापूर्वी फसवी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भांडवलदारांना रेड कार्पेट टाकून गोरगरीब जनतेला उध्वस्त करणारी धोरणे अवलंबिली आहेत. सामान्य जनतेच्या मुळावर उठलेल्या या केंद्रातील भाजप सरकारला देशभरातील जनता आता सवाल करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. पुढील पंधरवड्यात पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या वतीने शहरभर 'हाहाकार' जनजागरण अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यात नागरिकांनी सहभागी होऊन केंद्र सरकारविरुध्द निषेध नोंदवावा असे आवाहन डॉ. कदम यांनी या वेळी केले.

या अतंर्गत पदयात्रा, प्रभात फे-या, कोपरा सभा, पत्रके वाटप असे जनजागरणपर उपक्रम घेतले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील थेरगाव भागात पदयात्रा काढण्यात आली. तिचा समारोप अनुसया मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी पंडित नेहरूंनी उभे केलेले सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालून गोरगरीब जनतेला गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र मोदी, शहांचे सरकार करीत आहे, असा हल्लाबोल डॉ. कदमांनी केला. या वेळी पक्षाचे अखिल भारतीय सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश सचिव आणि पिंपरी चिंचवड प्रभारी विजय बारसे, गौतम आरकडे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव आदी उपस्थित होते.

Congress
दहशत-माफिया राज बोकाळलायं, रावणाला सुद्धा शक्तीचा गर्व होता ; पंकजा मुंडेचा रोख कुणाकडे?

ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत त्या राज्यांपुरते अनुकूल निर्णय घ्यायचे आणि इतर राज्यांमध्ये कृत्रिम महागाई निर्माण करुन जनतेला वेठीस धरायचे असे कुटील राजकारण भाजप सरकार करीत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील जनता आता रस्त्यावर उतरत आहे, असे साठे म्हणाले. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु असे सांगणा-या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दरवर्षी कोट्यावधी युवक बेरोजगार होत आहेत. हिटलरशाही पध्दतीने एका रात्रीत घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे लाखो कुटूंबे देशोधडीला लागली आहे. गरीबांसाठी कॉंग्रेस सरकारने सुरु केलेले रेशनिंगचे धान्य डाळी, रॉकेल, तेल आणि गॅसचे अनुदान या सरकारने बंद केले आहे, अशी तोफ त्यांनी डागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com