Pune : प्रतापगडाचा प्रश्न सोडवला तसा पुण्येश्वराचाही सोडवू, त्यासाठी रासनेंना निवडून द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

Kasba By-Election News : भाजप-युतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड-शो
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Kasba By-Election : '''गणेशोत्सवात गणेश मंडळावरील निर्बंध पूर्णपणे काढून मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेणार आहे. येणारे सर्व सण उत्साहात व जल्लोषात साजरे होतील. जसा प्रतापगडाचा प्रश्न सोडवला तसा पुण्येश्वरचाही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. कसब्यातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपचा उमेदवार विधानसभेत पाठवा'', असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या समारोपाच्या भाषणात केले.

भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी समता भूमी ते लाल महाल असा रोड शो केला. त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपती समोर झालेल्या सभेत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली. ''विरोधी उमेदवाराने खूप कामे केली ती कामे केली असे सांगितले जात आहे. पण धंगेकर यांनी त्रास दिल्याच्याही पंचवीस तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आपला उमेदवार रासने हा गरीब माणूस आहे'', असं शिंदे यावेळी म्हणाले,

Eknath Shinde
Politics : महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?; केजरीवालांनी दिले स्पष्ट संकेत

शिंदे म्हणाले, ''आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन खऱ्या अर्थाने राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. धनुष्यबाण चोरला असे म्हणणाऱ्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीकडे तो गहाण ठेवला होता. आम्ही तो सोडवला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात साधूंवर हल्ला झाला. पण तेव्हाचे मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. मात्र, आता राज्यात हे खपवून घेतले जाणार नाही'', असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

भाजप-युतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड-शो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी रोड-शो करत शक्तीप्रदर्शन केले. कसबा मतदारसंघातील गंजपेठ, गुरुवार पेठ, रास्तापेठ, बुधवार पेठ या दाट लोकवस्तीच्या भागातून समता भूमी ते लाल महल असा हा रोडशो करण्यात आला. यावेळी भाजपसह शिवसेनेचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Eknath Shinde
Kasba By-Election : रासनेंचा पराभव निश्चित : पण तो कमी मतांनी व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रचारात ; धंगेकरांचा मिश्किल टोला!

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे पूल ते शनिपार असा रोड-शो केला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रोड शोला सुरवात झाली.

हातामध्ये भगवे झेंडे, महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या घालून महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. समता भूमी, जनाई मळा, पालखी विठोबा चौक, हिंदमाता चौक, डोके तालीम, लक्ष्मी रस्ता, फडके हौद ते कसबा गणपती अशी रॅली काढण्यात आली.

Eknath Shinde
Konkan News : रामदास कदमांच्या होम ग्राऊंडवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; संजय कदम स्वगृही परतणार

यावेळी ढोल ताशा, बॅन्ड लावण्यात आला होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांना हात दाखवत प्रचार केला. चौकाचौकात क्रेनला मोठा हाल लावून, फटाके उडवून, मुख्यमंत्री व इतर नेत्यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच यावेळी ''छत्रपती शिवाजी महाराज की जय... हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो... कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला.. कसब्याची पसंत रासने हेमंत...'', अशा घोषणाही देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com