जुन्नरचे नगराध्यक्ष पांडे राष्ट्रवादीच्या गळाला? बेनकेंच्या फेसबूक पोस्टमुळे शिवसैनिक नाराज

पांडे हे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत न घेता मनमानी कारभार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
Sham Pandey
Sham Pandeysarkarnama

पुणे : जुन्नर शहराचे शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शाम पांडे (Sham Pandey)राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP)वाटेवर असल्याचे सध्याचे चित्र आहे. शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाची निमंत्रणे देण्यासाठी पांडे शिवसेनेच्या (Shiv Sena)पदाधिकाऱ्यांशिवाय राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि राष्‍ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात गेले होते. याबाबतची फेसबूक पोस्ट बेनके यांनी केली होती.

या पोस्टमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांशिवाय राष्ट्रवादीच्या गोटात दिसल्याने, आगामी निवडणुकांमध्ये पांडे राष्ट्रवादीत डेरेदाखल होण्याची चिन्हे आहे. पांडे यांच्या फोटोमुळे शिवसेना पक्ष श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. २०१७ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पांडे हे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते.

लोकनियुक्त नगराध्यक्ष असल्याने त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत न घेता मनमानी कारभार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींकडे पक्षश्रेष्ठीनी पांघरुन घातले. यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी होती.

Sham Pandey
मोठा निर्णय : राज्यात कामकाजाची भाषा मराठीच! राजभाषा विधेयक मंजूर

शिवसेनेचे उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी म्हणाले, ''नगराध्यक्ष मंत्रालयात जाणार असल्याची कोणतीही कल्पना पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराबाबत मी अनेक वेळा पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारींकडे पक्षश्रेष्ठींनी डोळेझाक केली. त्यांचे आता डोळे उघडले असतील,''

शिवसेनेचे गटनेते समीर भगत म्हणाले, ''शहरातील विविध विकासकामांबरोबरच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या अनावरणांची वेळ मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्र्यांकडे मागण्यासाठी जाणार असल्याचे मला माहिती होते. पण ते कोणाबरोबर जाणार हे माहित नव्हते. आम्हाला पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाण्याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती,''

Sham Pandey
'त्यांना' बारामतीला विमानतळ बांधू द्या, पण पुण्याचे विमानतळ हलविणार नाही!

नगराध्यक्ष पांडे म्हणाले, ''जुन्नर शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मी मंत्रालयात गेलो होतो. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊ कुंभार माझ्या सोबत होते. याठिकाणी आमदार बेनके हे भेटले नंतर आम्ही विविध मंत्र्यांना निमंत्रणे दिली. मी मंत्रालयात जाणार असल्याची कल्पना पालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी होती. मी शिवसेनेतच आहे आणि यापुढेही राहणार असल्याने राष्ट्रवादीच्या सलगी करण्याचा कोणताही प्रश्‍न नाही,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com