जुन्नर बिबट सफारी सर्व्हे सुरू ; तरीही शरद सोनवणेंचे उपोषण कशासाठी ; बेनकेंचा सवाल

सर्व्हे सुरू झाला असेल तर माजी आमदार सोनवणे यांचे उपोषण नेमके कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
 Junnar News, Atul Benke on Sharaddada Sonavane, Junnar leopard safari news
Junnar News, Atul Benke on Sharaddada Sonavane, Junnar leopard safari newssarkarnama

-रविंद्र पाटे

नारायणगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नरची बिबट सफारी Junnar leopard Safar) बारामतीला नेली या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमुळे मागील दहा दिवसां पासून जुन्नर तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विविध पर्यटन संस्थांनी जुन्नर बिबट सफारीसाठी सह्यांची मोहीम, पत्रव्यवहार सुरू केला. (Atul Benke on Sharaddada Sonavane)

विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर व तालुक्यातील विविध ग्रामपंचायती यांनी सुद्धा बिबट सफारी तालुक्यात व्हावी अशी मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी थेट दिल्ली येथे जाऊन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अतुल बेनके यांनी बिबट सफारी बाबत आक्रमक भूमिका घेतली होती.

जुन्नरच्या बिबट सफारीसाठी वनविभागाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील कुरण, वडगाव कांदळी, खोडद, उंचखडक या चार गावातील वन जमिनीचा प्राथमिक सर्व्हे करण्यात आला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून आमदार अतुल बेनके दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.

दरम्यान बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी या मागणीसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथे उपोषण सुरू केले आहे. यामुळे एकीकडे बिबट सफारीसाठी माजी आमदारांचे उपोषण तर दुसरीकडे बिबट सफारीचा सर्व्हे सुरू आहे. सर्व्हे सुरू झाला असेल तर माजी आमदार सोनवणे यांचे उपोषण नेमके कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आमदार बेनके म्हणाले, ''आंबेगव्हान येथील जागा योग्य नसल्याने व बिबट सफारीचा सर्व्हे परिपूर्ण नसल्याने जुन्नर बिबट सफारी संदर्भात निर्णय घेण्यासाठी २१ मार्च रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला मी स्वतः व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उपमुख्यमंत्री पवार ,पर्यटनमंत्री ठाकरे यांनी वनविभागाची योग्य जागा पाहून तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या,''

 Junnar News, Atul Benke on Sharaddada Sonavane, Junnar leopard safari news
सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; देशातलं पहिलं राज्य ठरलं! आश्वासन पूर्ण

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२४) तालुक्यातील कुरण, वडगाव कांदळी (१८८ हेक्टर) , खोडद(१२४ हेक्टर) , उंचखडक (५६५ हेक्टर) या चार गावातील वन जमिनीचा प्राथमिक सर्व्हे केला. या वेळी युवा नेते अमित बेनके, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार व संबधीत गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

 Junnar News, Atul Benke on Sharaddada Sonavane, Junnar leopard safari news
शाळेबाबत राज्य सरकारने घेतला महत्वाचा मोठा निर्णय

पाहणी केलेल्या जागांपैकी गुगल मॅपिंग द्वारे एक जागा निश्चित करून दोन दिवसात सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार , पर्यटनमंत्री ठाकरे , वन राज्यमंत्री दत्ता भरणे,आजी माजी आमदार, खासदार, जुन्नर पर्यटन संस्थेचे दोन प्रतिनिधी, पत्रकारांचा एक प्रतिनिधी अशी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महिन्याभराच्या आत सफारीसाठी निश्चित केलेल्या जागेचा डीपीआर तयार करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जूनच्या पुरवणी मागणीत बिबट सफारीला भरीव निधी देण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्य केले आहे. जुन्नरच्या बिबट सफारीसाठी मी कटीबद्ध आहे. विनाकारण कोणी राजकारण करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.

''जुन्नर तालुक्यात बिबट सफारी करण्याचा अंतिम निर्णय २१ मार्च रोजी झाला असताना माजी आमदार सोनवणे यांनी उपोषण सुरू केले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोनवणे यांना दोन वेळा फोन करून देखील राजकीय स्वार्थासाठी , नेत्याचा आदेश झुगारून सोनवणे यांचे उपोषण नाट्य सुरू आहे,'' असे आमदार अतुल बेनके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com