जो बायडन चाखणार कोकणातील हापूस आंब्याची चव

Joe Biden| Hapus Mango | पुण्यातील आंबा निर्यातदार कंपनी रेनबो इंटरनॅशनल हे आंबे निर्यात केले आहेत.
Joe Biden
Joe Biden

Joe Biden News :

पुणे : कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती. पण कोरोनाची (Covid 19) आकडेवारी कमी झाल्यानंतर या वर्षीपासून भारतातून अमेरिकेत आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील (maharashtra) उत्कृष्ट दर्जाचे आंबे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये (white house) पाठवण्यात आले आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारच्या आब्यांची पेटी थेट अध्यक्ष जो बायडन यांना पाठवण्यात आली आहे.

पुण्यातील आंबा निर्यातदार कंपनी रेनबो इंटरनॅशनल ही अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. यात महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली या प्रकारच्या आंब्यांचा समावेश आहे. सोमवारी हा आंबा अमेरिकेला पाठवण्यात आल्याचं रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए. एस. सी भोसले यांनी सांगितले. भसला हे देशातील आंब्याचे मोठे निर्यातदार आहेत. यापूर्वी वैयक्तिक पातळीवर व्हाईट हाऊसमध्ये आंबे पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पहिल्यांदाच भारताच्या प्रशासकीय पातळीवर शिष्टमंडळाच्या भेटीत त्यांच्या आंब्याच्या पेटीचा वापर करण्यात आला.

Joe Biden
अगवणेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सभापतींचे राजकारण...अनुप शहा

खास बाब म्हणजे रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने सुप्रिया सुळेंनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला. ''जळोची,बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे.'' असे ट्विट करत त्यांनी रेनबो इंटरनॅशनल चे कौतुक केले आहे.

तसेच, महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा, सुप्रिया सुळेंनी दिल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर हे आंबे सोमवारी पॅकिंग करुन अमेरिकेला पाठवण्यात आले. भारतीय दुतावासाने हे मंगळवारी विमानतळावरुन आंबे घेतले आणि पुन्हा एकदा त्याचे पॅकेजिंग केले. गुरुवारी ही आंब्याची पेटी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती ए. सी. भसला यांनी दिली.

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या परवानगीनंतर हे वर्षीपासून पुन्हा एकदा भारतातील आंबे अमेरिकेत पोहचले आहेत. 2020 कोरोना संसर्गामुळे अमेरिकेच्या कृषी विभागाचे अधिकारी भारतात आंबे चाचणी आणि निरीक्षणासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे भारतातील आबांही अमेरिकेत जाऊ शकला नाही. पण आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर यावर्षी आंब्यांची मागणी वाढली असल्याचे आंबा निर्यातदारांनी सांगितले आहे, त्यातही केसरपेक्षा हापूसला जास्त मागणी असल्याचेही निर्यातदार सांगत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com