फडणवीसांच्या आडून चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची मनीषा

शहाणा पक्ष एका खासदारासाठी नगसेवकांना धोक्यात टाकणार नाही, असे जयंत पाटील (Jayant Patil) काँग्रेसला उद्देशून म्हणाले.
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

पुणे : अगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे महापलिका निवडणुकीत (PMC Elections 2022) काँग्रेस पक्ष (Congress) स्वबळावर लढणार की युती करणार याबाबत अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी (NCP) व शिवसेनेच्या (Shivsena) सोबत यावे यासाठी आमचे स्थानिक पातळीवरचे नेते चर्चा करतील, त्यास आमचा पाठिंबा असेल, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) स्पष्ट केले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणाले "लोकसभेचा एक खासदार मिळविण्यासाठी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या नगरसेवकांना धोक्यात टाकणे असे कोणताही शहाणा पक्ष करणार नाही. त्यामुळे आघाडी करून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यावरच सर्व पक्षांचा भर असणार आहे.

Bjp Leader Chandrakant Patil
भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीला बिनविरोध विधानसभेत पाठवावे

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्त नगरसेवक आल्यास लोकसभा निवडणुकीला पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल यामुळे काँग्रेसचा आघाडीत येण्यास विरोध आहे का? राष्ट्रवादीची याबाबत काय भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पाटील यांनी "एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही, असे उत्तर दिले.

पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र यावेत ही आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून ? सोबत घेतील, त्यास आमची सहमती असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.

Bjp Leader Chandrakant Patil
लोकप्रिय गायकाच्या काँग्रेस प्रवेशाने आमदारासह पाच नेत्यांचा पत्ता कट?

नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांची समजूत काढणार का? या प्रश्‍नावर पाटील म्हणाले, समजूत काढण्याचा प्रश्‍न येत नाही, वारंवार ते जर स्वबळाची भाषा करत असतील तर ते त्यांचे धोरण होते. तरी देखील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे वेगळी भूमिका व्यक्त करत असतील तर, ते भूमिका बदलू शकतील.

भाजपविरोधात जे आहेत त्यांना एकत्र घेतले पाहिजे कोणालाही सोडणे बरोबर नाही. सध्या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. महागाई, शेतकरी आंदोलन असे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे. हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. शिवसेना आमच्यापासून दूर जावी यासाठी फडणवीस हे कायम सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. राजकारणासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली.

चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची कुठलीही घाई नाही. मात्र, चंद्रकांत पाटीलांनाच घाई झाली आहे. फडणवीस यांच्या आडून तेच मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगून आहेत. मात्र, पक्षात आपले हितचिंतक कोण आहेत हे फडणवीसांना चांगले माहिती असल्याचा टोला पाटीलांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com