जयंत पाटलांचेही पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट ,भाजप आमदार लांडगेंचं केलं सांत्वन...

Jayant Patil : आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई लांडगे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
Jayant Patil, Mahesh Landge Latest News
Jayant Patil, Mahesh Landge Latest NewsSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजप (BJP) अध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे, रा. भोसरी) यांचे नुकतेच (ता.२४ सप्टेबर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यासह कुटुंबियांच्या सांत्वनासाठी भोसरीतील त्यांच्या निवास्थानी राज्यभरातून सर्वच पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे.

Jayant Patil, Mahesh Landge Latest News
ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; 'दुआरे राशन' योजना ठरवली बेकायदेशीर

राजकारण करण्याची आमदार लांडगेंची पद्धत जरा वेगळी आहे. ते `पॉलिटिक्स विथ रिसपेक्ट`ने ते करतात. त्यामुळेच त्यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांच्या घरी पक्षभेद,मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची राज्यभरातून सांत्वनासाठी रांग लागली आहे. गेले चार दिवस ती कायम आहे. (Jayant Patil, Mahesh Landge Latest News)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेचच आपल्या या आवडत्या पैलवान आमदाराला भेटून गेले. त्यानंतर भाजपच्या इतर नेतेमंडळीची रांग लागली. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांत्वन करून गेले. यावेळी विधान परिषद सदस्या उमा खापरे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,प्रदेश सचिव अमित गोरखे,शहर सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे आदी हजर होते.भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि फायरब्रॅण्ड नेत्या चित्रा वाघ या सुद्धा काल लांडगेंना भेटून गेल्या.

Jayant Patil, Mahesh Landge Latest News
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीसाठी आलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही वेळ काढून लांडगेंच्या घरी काल गेले. त्यांनी आस्थेने लांडगे व कुटुंबियांची विचारपूस केली. त्यांचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला. यावेळी भोसरीचे प्रथम आमदार, राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर स्थानिक पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे राज्याचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनीही लांडगेंची भोसरी निवासस्थानी काल त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in