महाराष्ट्रात अघटीत घडवण्याच्या प्रयत्नांची सुरुवात; जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती

MNS| Shivsena|Mahavikas Aghadi| Jayant Patil| शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील ओवैसी म्हणत डिवचल्यानेही हा वाद शिगेला पोहचला आहे.
Jayant Patil|
Jayant Patil|

पुणे : एकीकडे राज ठाकरे हनुमान चालिसाचा आग्रह करत आहेत, आत काही दिवसांनी असदुद्दीन ओवैसी येतील आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करुन काहीतरी अघटीत घडवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपंदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रेदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून राज्यात मशिदींवरील भोंगे विरूद्ध हनुमान चालिसा असा वाद पेटला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील ओवैसी म्हणत डिवचल्यानेही हा वाद शिगेला पोहचला आहे. राज्यातील घडामोडींबाबत बोलताना जयंत पाटील जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Jayant Patil|
अजित पवारांनी जपला भावनिक बंध; सर्व उद्घाटनं रद्द करत लक्ष्मण जगतापांच्या भेटीला

'महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो. राज ठाकरे हनुमान चालिसाचा आग्रह करणार, थोड्या दिवसांनी ओवीसी या पिक्चरमध्ये येणार आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा, काहीतरी अघटीत घडवण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात आहे. हळूहळू महाराष्ट्राला या गोष्टी दिसत जातील.' अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

इतकेच नव्हे तर राज्यात पेट्रोल-डिझेल महाग आहे. गॅस महागला आहे. सिमेंट, स्टिल या गोष्टींही महागल्या आहे. पण याची कोणीही चर्चा करत नाही. हनुमान चालिसाची चर्चा होते. आम्हीपण हनुमान, रामाचे भक्त आहोत, पण आम्ही याचं कधीही प्रदर्शन केलं नाही. त्यामुळे राजकारणासाठी जाणीवपूर्वक देवांना वापरणे हे आम्ही कधीही केलं नाही,” असे जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com