हा तुला शेवटचा चान्स, उपसरपंचपदाचा राजीनामा दे; नाहीतर...

उपसरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी जामगावचे विनोद सुर्वे यांना जीवे मारण्याची धमकी
हा तुला शेवटचा चान्स, उपसरपंचपदाचा राजीनामा दे; नाहीतर...
threatsarkarnama

पौड (जि. पुणे) : ‘तू नीलेश सुर्वे आणि योगेश ठोंबरे यांच्या नादी लागतो का, उपसरपंच (Deputy Sarpanch) पदाचा राजीनामा दे,’ असे धमकावत चार अज्ञातांनी मुळशी तालुक्यातील जामगावचे उपसरपंच विनोद वसंत सुर्वे (वय 38) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. ही घटना शनिवारी (ता. 22 जानेवारी) सायंकाळी दारवली रस्त्यावर घडली. (Jamgaon's Deputy Sarpanch Vinod Surve threatened to kill)

जामगावचे उपसरपंच असलेले विनोद सुर्वे यांची वाकड येथे कंपनी आहे. ते शनिवारी जामगावहून वाकडला घराच्या दिशेने आपल्या इनोव्हा मोटारीतून (एमएच 12; टीएन 3503) चालले होते. त्यांची मोटार शेखर धोंडीबा गोपालघरे हे चालवत होते. तोंडाला कापड गुंडाळलेल्या चार व्यक्तींनी त्यांची गाडी दारवली गावच्या पुढे ओढ्याजवळ अडविली. त्यातील एकजण चालकाच्या बाजूला, तर इतर तिघे सुर्वे बसलेल्या बाजूकडे गेले. त्यांच्या हातात कोयता होता.

threat
डिसले गुरुजींनी काळजी करू नये : शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन नरमले!

त्यांनी सुर्वे यांना शिवीगाळ करत ‘तू नीलेश सुर्वे, योगेश ठोंबरे यांच्या नादाला लागतो का, उपसरपंचपदाचा राजीनामा दे, हा तुला शेवटचा चान्स आहे,’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यातील एकाने रस्त्यावरील दगड उचलून सुर्वे बसले होत्या, त्या बाजूला गाडीच्या काचेवर फेकला. त्यात गाडीची काच फुटली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून सुर्वे यांनी गाडी चालू करून तिथून पळ काढला. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात जावून नीलेश दत्तात्रेय सुर्वे, योगेश लक्ष्मण ठोंबरे यांच्यासह चार अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे.

threat
पैशाचा हव्यास आणि मुली झाल्याच्या त्रासाने सारिकासह दोन चिमुकलींचा घेतला बळी!

सुर्वे यांना उपसरपंचपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी गेली तीन-चार महिन्यांपासून धमकी दिली जात आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला दारवलीच्या हद्दीत सुर्वे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरदेखील असाच हल्ला झाला होता. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याची गाडी (एमएच 12; एमएफ1604) अडवून लाकडी दांडक्याने काच फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी नीलेश सुर्वे व त्यांचे मामा सुनील ठोंबरे यांना मारहाण करून आरोपी पळून गेले होते. त्यावेळीही सुर्वे यांच्या फिर्यादीवरून विनोद सुर्वे व तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.