जळगाव जिल्हा बॅक राष्ट्रवादीकडे आली अन् पवारांनी दिला हा सल्ला

गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील व आमदार अनिल पाटील यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.
Satish Patil,Sharad Pawar,Gulabrao Deokar
Satish Patil,Sharad Pawar,Gulabrao Deokarsarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank Election Results) संचालक पदाच्या नुकतीच निवडणुक झाली. यात राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, व कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या सहकार गटाने यश मिळविले व अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) झाले.

जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर, संचालक डॉ.सतीश पाटील (Satish Patil) व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिल्ली येथे निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

याबाबत माहिती देतांना डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले, कि पवार यांनी जिल्हा बँक निवडणूकीची माहिती घेतली, तसेच जिल्ह्याबाबत चर्चा केली, यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले, जिल्हा बँकेत अनुभवी संचालक निवडून आले आहेत, तुम्ही सर्व संघटीत होवून काम करा, शेतकरी हिताचे निर्णय घ्या, शेतकऱ्यांना न्याय देवून तुमच्या कामाचा ठसा उमटवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Satish Patil,Sharad Pawar,Gulabrao Deokar
स्वच्छतागृह हटविल्याबद्दल महापौरांवर अॅट्रोसिटीचा आदेश.. नंतर कोर्टाची स्थगिती

''जिल्हा बँकेत चांगले अनुभवी लोक संचालकपदी निवडून आले आहेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना करून द्या व त्यांना न्याय देवून तुमच्या कामाचा ठसा उमटवा,'' असे मत शरद पवार यांनी जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी दिल्लीत बोलतांना व्यक्त केले.

जळगाव जिल्हा बॅंक निवडणुकीवर (Jalgaon District Bank Election Results) भाजपनं बहिष्कार टाकल्याने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवित महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com