राष्ट्रवादी कार्यकर्ते रविराज तावरे गोळीबार प्रकरणात जयदीप तावरेंना जामीन मंजूर

सुरुवातीला (चार महिन्यापूर्वी) याच न्यायालयाने प्रकरणाचे गार्भीय व तपासातील माहिती विचारात घेत तावरे यांचा जामीन नाकारला होता.
Jaideep Taware
Jaideep TawareSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर ३१ मे रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. पी. आगरवाल यांनी आज सायंकाळी जामीन मंजूर केला. या प्रकरणातील तपासासाठी पोलिसांना सहकार्य करावे, अशा विविध अटींच्या आधारे जामीन मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. विशेषतः सुरवातीला (चार महिन्यापूर्वी) याच न्यायालयाने प्रकरणाचे गार्भीय व तपासातील माहिती विचारात घेत तावरे यांचा जामीन नाकारला होता. परिणामी, त्यांना येरवडा कारागृहात चार महिने राहावे लागले आहे. (Jaideep Taware granted bail in Raviraj Taware firing case)

दरम्यान, बारामतीचे तत्कालिन तपासाधिकारी नारायण शिरगावकर यांनी रविराज तावरे गोळीबार प्रकरणात जयदीप तावरे यांचा सहभाग नाही, असा २१ जुलै २०२१ रोजी दिलेला अहवाल दरम्यानच्या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी फेटाळला होता. तसेच, या प्रकरणी पुण्यातील मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती आगरवाल यांचा चार महिन्यांपूर्वीचा निर्णय कायम ठेवला होता. त्या प्रक्रियेविरुद्ध जयदीप तावरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे न्यायालयाच्या सुचनेनुसार जयदीप यांनी स्वतःला चार महिन्यांपूर्वी पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

Jaideep Taware
‘मला आता पुढच्या निवडणुकीत निवडून देऊ नका...’ : अजितदादा भरसभेत असे का म्हणाले?

मोका न्यायालयाने प्रथमदर्शनी जयदीप तावरे यांच्याविरुद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याचे सांगितले होते. त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार सध्याचे तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकरणाचा केलेला तपास न्यायालयात महत्वपूर्ण ठरल्याचे सांगण्यात आले.

Jaideep Taware
नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार...? जाधव, गीते, किर्तीकर आणि आता सावंत!

दुसरीकडे, रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी माळेगावातील प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम ऊर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलिसांनी संबंधितांविरोधात मोका अंतर्गत कारवाई केली होती. एक अल्पवयीन मुलगा वगळता इतर संशयित आरोपी अद्याप जेरबंद आहेत. जयदीप तावरे यांच्या वतीने ॲड. सचिन वाघ, ॲड. नामदेव पाटील, ॲड. ओंकार टोळे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com