रविराज तावरे गोळीबार प्रकरण : माळेगावचा माजी सरपंच जयदीप तावरे अखेर पोलिसांना शरण!

तत्कालिन तपासाधिकारी नारायण शिरगांवकर यांनी गोळीबार प्रकरणात जयदीप तावरेचा सहभाग नाही, असा दिलेला अहवाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी फेटाळला होता.
Jaideep Taware
Jaideep TawareSarkarnama

माळेगाव (जि. पुणे) : बारामती (baramati) तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते रविराज तावरे (raviraj taware) यांच्यावर ३१ मे २०२१ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारलेले माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे (Jaideep Taware) हा सोमवारी (ता. २२ नोव्हेंबर) रात्री उशीरा पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. (Jaideep Taware, fugitive accused in Malegaon firing case, finally appeared before police)

तत्कालिन तपासाधिकारी नारायण शिरगांवकर यांनी रविराज तावरेंवरील गोळीबार प्रकरणात जयदीप  तावरे याचा सहभाग नाही, असा दिलेला अहवाल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी फेटाळला होता. तसेच, या प्रकरणी पुण्यातील मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. पी. आगरवाल यांचा निर्णय कायम ठेवला होता. त्या प्रक्रियेविरुद्ध जयदीप याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, तेथेही त्याला दिलासा मिळाला नाही. यामुळे न्यायालयाच्या सूचनेनुसार जयदीप तावरे याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेला पोलिसांनीही दुजोरा दिला.

Jaideep Taware
सतेज पाटलांना टक्कर देणाऱ्या अमल महाडिकांकडे २१ कोटींची मालमत्ता

मोका न्यायालयाने प्रथमदर्शनी जयदीप तावरे याच्याविरुद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याचे सांगितले होते. त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आता तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना जयदीप तावरे हा पोलिसांच्या ताब्यात आल्याने पुढील तपास करणे सोयीचे झाले आहे. 

Jaideep Taware
त्या इशाऱ्यानंतर नाना पटोले आठवडाभरातच बारामती मतदारसंघात!

याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण म्हणाले की, जयदीप तावरे हा अनेक दिवस फरार होता. अर्थात त्याने वरिष्ठ न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तसे न झाल्याने त्याला स्वतःहून पोलिसांत हाजर होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याला मंगळवार (ता.२३ नोव्हेंबर) तपासाधिकारी उपविभागीय अधिकारी संबंधित न्यायालयात हाजर करतील.

Jaideep Taware
सतेज पाटलांनी अनेकांच्या कळा काढल्यात, आता तेच नेते पालकमंत्र्यांचा कार्यक्रम करणार!

दरम्यान,  रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे याचा सहभाग नाही, असा अहवाल तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगांवकर यांनी २१ जुलै रोजी  दिला होता. तो अहवाल मोका न्यायालयाचे न्यायमूर्ती आगरवाल यांनी फेटाळला होता. शिवाय त्यांनी तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या जयदीप याला शरण यावे व १८ ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करावे, असे आदेश दिले होते. दुसरीकडे, रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी माळेगावातील प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम ऊर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल ऊर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर खून करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोकातर्गत कारवाई केली होती. एक अल्पवयीन मुलगा वगळता इतर संशयित आरोपी अद्यापही जेरबंद आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com