जगदीश मुळीक म्हणतात; प्रशांत जगतापांना मुळीच गांभीर्याने घेत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात कॉंग्रेसने निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
Mulik-Jagtap
Mulik-JagtapSarkarnama

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरीच भूमिका असते. त्यांच्या घोषणांना आपण गांभीर्याने घेत नाही.त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत.हे वारंवार सिद्ध झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी केली आहे.

Mulik-Jagtap
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला तीव्र विरोध : फडणवीस

शहरातील सिग्नल यंत्रणांचे सुसूत्रीकरण, महापालिकेचे कोरोना काळातील कॉफी टेबल बुक, शहरात उभी राहत असणारी रुग्णालये यांच्या बाबतीत त्यांनी आंदोलने केली. परंतु त्यांच्या महापालिकेतील सर्वच सभासदांनी या ठरावांना एकमुखी पाठींबा देत जगताप यांना तोंडघशी पाडले. महापालिकेत एकशे बावीस नगरसेवक निवडून येतील या जगताप यांच्या विधानाची त्यांचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडविली होती,अशी टीका मुळीक यांनी केली.

पंतप्रधान मोदींच्या विरोधात निदर्शने करण्याची जगताप यांची भाषा अशीच वल्गना करणारी आहे.कारण अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे विधान करून जगताप यांना पुन्हा उघड्यावर पाडले आहे. त्यामुळेच जगताप यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, असे मुळीक यांनी सांगितले.

Mulik-Jagtap
मला चंद्रकांतदादांची कीव येते ; संजय राऊतांचा टोला

काँग्रेसलाही जशास तसे उत्तर देऊ

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा,मुळीक यांनी दिला.

मुळीक म्हणाले, ‘‘देशात महाराष्ट्र कॉंग्रेसमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान शंभर टक्के सत्य आहे. त्यामुळे कोरोना देशभर वेगाने फैलावला. हे सत्य पचविण्याची ताकद कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नाही. त्यामुळेच अस्तित्व टिकविण्यासाठी नैराश्याच्या भावनेतून कॉंग्रेस टीका करीत आहे.भाजपाने पुण्यासाठी काय केले हा प्रश्न विचारण्याचे धाडस कॉंग्रेसचे नेते करतात याचे आश्चर्य वाटते. खरे तर कॉंग्रेसने पन्नास वर्षांत काय केले हा खरा प्रश्न आहे. पुणे मेट्रो काँग्रेसच्या काळात कागदावरच राहिली. राज्यात आणि केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर मेट्रोला गती मिळाली आणि केवळ पाच वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागली.’’

भाजपाने पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही नक्की सत्तेत येऊ असा विश्वास वाटतो. मोदी यांचा दौरा पूर्णपणे शासकीय आहे. त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने करू नये. अन्यथा २००७ च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ३ डिसेंबर २००६ रोजी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग ‘बीआरटी’च्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांचा हा दौरा राजकीय होता का असा प्रश्न विचारा लागेल, असे मुळीक यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com