'याला हुजरेगिरी नाही तर संस्कृती म्हणतात'; सुनील शेळकेंचा भाजपला सणसणीत टोला
Sunil Shelke Replied to BJP

'याला हुजरेगिरी नाही तर संस्कृती म्हणतात'; सुनील शेळकेंचा भाजपला सणसणीत टोला

संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या खासदारांना भेटायला गेलेल्या राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खुर्ची आणून दिली होती.

पुणे : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदरांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या खासदारांना भेटायला गेलेल्या राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खुर्ची आणून दिली. या प्रसंगावरुन भाजपने संजय राऊतांवर अनेकदा टीकेचे बाण सोडले. शरद पवार यांना खुर्ची दिल्याच्या प्रसंगानंतर खासदार संजय राऊत हे हुजरेगिरी करतात, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली होती. याला सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी गुरुवारी (१३ जानेवारी) वडगाव मावळ येथे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. (Sunil Shelke Replied to BJP)

'याला हुजरेगिरी नाही तर संस्कृती म्हणतात. पण भाजप आपली संस्कृती विसरला आहे. मोठ्यांचा आदर करण्याची ही संस्कृती संजय राऊतांकडून आपण शिकावी,' असा सणसणीत टोला आमदार सुनील शेळके यांनी गणेश भेगडेंना लगावला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. याच दरम्यान भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनील शेळके यांनी चांगलेच उत्तर दिले होते. त्यानंतर गणेश भेगडे यांनी पुन्हा सुनील शेळकेंवर टीका केली. दरम्यान, सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा प्रतिउत्तर दिले आहे.

Sunil Shelke Replied to  BJP
रस्त्याचे डांबरीकरण करताना कंत्राटदार डांबर टाकायलाच विसरला

''अतुल भातखळकर हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देताना जबाबदारीने बोलायला हवे. राऊत यांनी शरद पवारांना खुर्ची देणे ही हुजरेगिरी नाही, तर यालाज्येष्ठांचा सन्मान करण्याची संस्कृती म्हणतात’ असे म्हटले आहे. पण आज देहूत भाजपाला उमेदवार नाही, तळेगाव नगरपरिषदेतही भाजपचे नगरसेवक भ्रष्टाचारात अडकले आहेत. लोणावळ्यातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

मावळात रस्ते, पाणी योजना व विकास कामांवर बोलायला विरोधकांना जागा उरली नाही. त्यामुळेच आता भाजप समाजात तिढा निर्माण करण्याचे काम करत आहेत. मात्र विकास कामांच्या जोरावरच मावळची जनता आज आमच्या पाठीशी ठाम उभी आहे. मावळच्या जनतेला अहंकार चालत नाही, ज्यांना अहंकार होता त्यांचा अहंकार मावळने दोन वर्षांपूर्वीच मोडला आहे. मी अहंकार केला तर मावळची जनता मलाही जागा दाखवील, अशी स्पष्टोक्ती करत आमदार सुनील शेळके यांनी गणेश भेगडे यांचे आरोप धुडकावून लावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.