अजित पवारांनी भाषण करावे, अशी मोदींची इच्छा होती; पण....

अजित पवार Ajit Pawar यांना बोलायला मिळाले नाही, यात महाराष्ट्राचा maharashtra अपमान Insult कसा झाला, असा प्रश्न चंद्रकांत पाटील chandarkant Patil यांनी उपस्थित केला.

अजित पवारांनी भाषण करावे, अशी मोदींची इच्छा होती; पण....
Chandrakant patilsarkarnama

पुणे ः देहू येथील संत तुकाराम मंदीराच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून दिलं नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीकडून आंदोलने होत आहेत. हा विषय चंद्रकांत पाटील यांनी मात्र, एकाच वाक्यात संपवला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार यांना भाषणासाठी उठा म्हटले. पण, अजितदादांनीच नकार दिला, त्यामुळे अजित पवारांनी भाषण केलं नाही. यात महाराष्ट्राचा अपमान झाला असं काहीही नाही, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील दिले.

देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदींचे नाव भाषणासाठी पुकारले, त्यावेळी ते उठलेच नव्हते. त्यांनी अजित दादांकडे पाहून 'आपको बोलना चाहिए' असे म्हणाले. मुळात अजित पवारांनी बोलावे अशी मोदींची इच्छा होती. पण अजित दादांनी नकार दिल्याने त्यांचे भाषण झाले नाही.

Chandrakant patil
जावळीतील 54 गावांचा पाणीप्रश्न सुटणार; बोंडारवाडीला निधी देणार... अजित पवार

त्यामुळे प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. हा अत्यंत साधा विषय आहे. हा महाराष्ट्राच्या अपमानाचा विषय नाही, देशाच्या पंतप्रधानांकडे सगळेच येते. त्यामुळे अजित पवार यांना बोलायला मिळाले नाही, यात महाराष्ट्राचा अपमान कसा झाला, असा प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला. खुद्द अजित पवार यांनी मत व्यक्त केलेले नाही. देहूच्या संस्थानालाच बोलायला मिळाले नसते तर अपमान म्हणता आला असता, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, हा अनावश्यक वाद निर्माण केला आहे. पण, सर्वसामान्य माणसाला यातील राजकारण कळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in