बाळासाहेब ठाकरेंमुळेच 'मी नथुराम गोडसे बोलतोय' सादर करू शकलो

या नाटकाला विरोध करणाऱ्यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या.

बाळासाहेब ठाकरेंमुळेच 'मी नथुराम गोडसे बोलतोय' सादर करू शकलो
शरद पोंक्षेसरकारनामा

पुणे : 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या प्रारंभीच्या आणि शुभारंभाच्या प्रयोगांना अनेक राजकीय पक्षांच्या विरोधाला, मोर्चांना आम्हाला सामोरे जावे लागले. माझ्या घरच्यांना अनेक धमक्यांचे फोन आले. परंतु या सगळ्या कठीण प्रसंगात फक्त बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच माझ्या नाटकाचे पुढचे प्रयोग सुरक्षित रित्या पार पडले. या नाटकाला विरोध करणाऱ्यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या.त्यानुसार ''काही तुडवायचे कार्यक्रम'' देखील झाले. अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी आज पुण्यात सांगितली.

शरद पोंक्षे
शिक्षक होण्याची आस असलेल्या हजारो उमेदवारांना बसला एसटी संपाचा फटका

हौशी आणि प्रायोगिक नाटक असा भेद करत नाही. नाटक हे नाटक असते. अभिनेता आणि गायक होण्यासाठी कलागुण घेऊन यावे लागतात. प्रत्येक कलाकाराला मोठे होण्यासाठी उत्तम कलाकृतीचे समीकरण व्हावे लागते. समीकरण झाल्याशिवाय मोठा कलाकार होता येत नाही. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या माध्यमातून माझे नाव या भूमिकेवर कोरले गेले. अनेक वर्षे दडपला गेलेला इतिहास 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या माध्यमातून मला पुनर्जिवीत करता आला, असे पोंक्षे यांनी सांगितले.

शरद पोंक्षे
राज्य सरकारच्या जाचक अटींमुळे ३० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाच नाही

पोंक्षे यांच्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचा लोकार्पण सोहळा आज पुण्यात झाला. यावेळी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी पोंक्षे यांची यांची मुलाखत घेतली.यावेळी पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली. पोंक्षे म्हणाले, ‘‘नाटकाच्या प्रारंभीच्या आणि शुभारंभाच्या प्रयोगांना अनेक राजकीय पक्षांच्या विरोधाला, मोर्चांना आम्हाला सामोरे जावे लागले. माझ्या घरच्यांना अनेक धमक्यांचे फोन आले. परंतु या सगळ्या कठीण प्रसंगात फक्त बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच माझ्या नाटकाचे पुढचे प्रयोग सुरक्षित रित्या पार पडले. या नाटकाला विरोध करणाऱ्यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार ''काही तुडवायचे कार्यक्रम'' देखील झाले. अशी आठवण यावेळी पोंक्षेंनी सांगितली.’’

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in