'दौंड शुगर्स'सह राज्यातील पाच कारखान्यांवर छापे

दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar mill), पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते.
daund sugar
daund sugarsarkarnama

-प्रफुल्ल भंडारी

दौंड : भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या तक्रारीवरुन सध्या राज्यातील साखर कारखान्यांवर आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. राज्यातील पाच साखर कारखान्यांवर आणि बारामतीमधील एका व्यक्तीच्या घरी छापा टाकल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar mill), पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते.

दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (daund sugar) या खासगी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्राप्तीकर विभागाने शोध मोहिम सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या साखर कारखान्याचे मार्गदर्शक आहेत.

आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर लिमिटेड या खासगी कारखान्याच्या कार्यालयात ७ आॅक्टोबर रोजी सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. प्राप्तीकर विभागाचे विविध पथक कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करीत आहेत. कारखान्याचे संचालक तथा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी त्यास दुजोरा दिला. ते म्हणाले , `` कारखान्यात प्राप्तीकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांची शोध मोहिम सुरू आहे.``

प्राप्तीकर विभाग नेमक्या कोणत्या कारणास्तव शोध मोहिम राबवित आहे याचा तपशील उपलब्ध झाला नाही.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित दौंड सहकारी साखर कारखान्याचे सन २००९ मध्ये दौंड शुगर लिमिटेड मध्ये रूपांतर झाले होते. देवळाली प्रवरा (ता. राहुरी, जि. नगर) येथील जगदीश कदम या कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रसामग्रीने कारखाना परिपूर्ण आहे. दररोज ६००० टन उसाचे गाळप करण्याची कारखान्याची क्षमता आहे. साखर निर्मितीसह १८ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प आणि प्रतिदिन ९०००० लिटर उत्पादन क्षमतेचा आसवनी प्रकल्प आहे. दौंड तालुक्यात सर्वाधिक ऊसदर, स्वच्छता, हिरवाई आणि साखर पूरक उद्योगांसाठी कारखाना ओळखला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com