Sharad pawar : बारामतीकरांना माझ्यापेक्षाही मोठं करण्याची जबाबदारी माझी : शरद पवार

बारामतीकरांच्या आशीर्वादावर गेली ५६ वर्षे मी यशस्वी समाजकारण करीत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

बारामती : ज्यांनी मला मोठं केलं, त्या बारामतीकरांना आपल्यापेक्षा मोठं करायचं, ही माझी जबाबदारी आहे. बारामतीकरांच्या आशीर्वादावर गेली ५६ वर्षे मी यशस्वी समाजकारण करीत आहे, त्यामुळे बारामतीकरांप्रती माझीही जबाबदारी आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती व बारामतीकरांविषयी त्यांच्या मनातील भावबंध उलगडून दाखविले. (It is my responsibility to make Baramati people bigger than me : Sharad Pawar)

बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक जुन्या संदर्भाचा उल्लेख केला. कलंदर गुरुजींचा नामोल्लेख करत मला अडचणीच्या काळात कलंदर गुरुजींनी प्रचंड साथ दिली, असे सांगत त्यांच्याप्रती पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Sharad Pawar
Shivsena News : ‘उद्धव ठाकरेंची साथ सोडा अन॒ आमच्याकडं या; २० कोटींचा फंड देतो : शिवसेनेच्या ४ नगरसेवकांना ऑफर’

बारामतीकरांनी मला १९६७ मध्ये निवडून दिल्यानंतर अखंडपणे ५६ वर्षे माझा प्रवास सुरु आहे. बारामती एक शिक्षणाचं केंद्र बनावं, अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा आता पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचे मला समाधान आहे, असेही शरद पवार या वेळी म्हणाले. स्वतः मी, अजित पवार, सुप्रिया सुळे अनेक शिक्षण संस्थांवर कार्यरत असून या सर्वच संस्थांतून लाखो मुले शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचीच आमची भूमिका आहे.

बारामती म्हणजे कर्तृत्ववान लोकांची खाण असून त्यांना शोधून काढून त्यांना योग्य आकार द्यायला हवा, त्यानंतर तो हिरा म्हणून निश्चितपणे चमकेल, अशा शब्दांत त्यांनी बारामतीकरांविषयी गौरवोद्‌गार काढले.

Sharad Pawar
Old Pension Scheme : आमदारांची पेन्शन रद्द करा; पण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा : आमदार विक्रम काळे आक्रमक

तिने माझ्यासाठी विमान पाठविण्याची तयारी दाखवली...

शरद पवार यांनी अमेरिकेतील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, मी मध्यंतरी न्यूयॉर्कला गेल्यावर एका मुलीचा मला फोन आला, तुम्ही घरी जेवायला या. ती बारामती तालुक्यातील नीरावागज येथील देवकाते यांची मुलगी. नवरा-बायको दोघेही अमेरिकेत मोठ्या पदावर कार्यरत होते. विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण झाल्याचे सांगत तिने आवर्जून घरी येण्याचे निमंत्रण दिले. तिला विचारलं कुठं यायचं, तर तिने शिकागोला या म्हणून सांगितले.

Sharad Pawar
Thackeray on Konkan Tour : उद्धव ठाकरेंनी कदमांच्या ‘होम ग्राउंड’वरील सभेची जबाबदारी दिली ‘या’ दोन मोठ्या नेत्यांवर!

आता न्यूयॉर्क ते शिकागो हे अंतर सात तासांचे असल्याने कसं जायचे, असा मला प्रश्न पडला. तिने तत्काळ सांगितले, काही काळजी करु नका, तुम्हाला घ्यायला मी न्यूयॉर्कला विमान पाठवून देते. काही क्षण माझाही विश्वास बसला नाही. पण तिने माझ्यासाठी विमान पाठविण्याची तयारी दाखवली....म्हणजे मुलींना संधी दिली, तर त्या कुठे जाऊ शकतात, हे त्याचे उदाहरण असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. ज्ञानाचा मक्ता कोणा एका विशिष्ट वर्गाकडे नाही, कष्टाची तयारी व ज्ञान संपादन करण्याची तयारी असेल तर काही अशक्य नसते, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com