अतिउत्साही पाठीराख्यांमुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येतायेत का?

ज्या जागेत हे उद्यान बांधण्यात आले ती जागा महापालिकेच्या (PMC) मालकीची आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नावाच्या उद्यानाचे उद्घाटन आज त्यांच्याच हस्ते होणार होते. मात्र, चौफेर टीकेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सकाळी जाहीर करण्यात आले. उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांचे नाव देण्याचा निर्णय लगेचच घेण्यात आला. नव्या नावासह आजच सायंकाळी उद्घाटन करण्याचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेचा ठराव न घेता हा कार्यक्रम ठरविण्यात आला. अशा प्रकारातून काही उत्साही पाठीराख्यामुळे मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येत नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde
'...मग आम्हाला दिपक केसरकरांसारखा संत माणूस भेटला!'

ज्या जागेत हे उद्यान बांधण्यात आले ती जागा महापालिकेच्या मालकीची आहे. बांधकाम स्थानिक माजी नगरसेवकांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जर जागा महापालिकेची असेल तर सर्वसाधारण सभेत ठराव करून उद्यानाचे नाव मंजूर करून घेतले आहे का? कार्यक्रमासाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी घेतली आहे का? असे प्रश्‍न विचारण्यात येऊ लागले आहेत.

Eknath Shinde
Anand Dighe : उद्यानाच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा

उद्यानाच्या उदघाटनाची घाई करण्यापेक्षा सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणे पार करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन ठेवले असते तर ते अधिक योग्य ठरले असते. त्यात महापालिकेचा मान राहिला असता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करायचे म्हणून महापालिकेचा अवमान करावचा हे योग्य आहे का ? असा एकुण चर्चेचा सूर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन आणि त्यांचेच नाव उद्यानाला देण्यात आल्याने महापालिका प्रशासन गप्प बसले. मात्र, मुख्यमंत्र्यांऐवजी अन्य कुणाच्या हस्ते हा कार्यक्रम असता तर महापालिका प्रशासन गप्प बसले असते का ?

कोणत्याही पक्षाचे असले तरी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. इतका मोठा आधिकार असलेल्या राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांचा अवमान योग्य आहे का? अशी विचारणा करण्यात येऊ लागली आहे. या संदर्भात आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलेली भूमिका लक्षात घेतली तर त्यांना या साऱ्या विषयातील तपशीलवार माहिती नव्हती असे दिसते. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रद्द केला. याचा थेट अर्थ असा की स्थानिक राजकारणातील श्रेयाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, यातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या चांगल्या प्रतिमेवर ओरखडे ओढले जाऊ शकतात याची संबंधितांना कल्पना आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in