IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती? ही घ्या यादी...

IPS Krishna Prakash | पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यावर नुकताच २०० कोटी रुपये वसुलीचा आरोप झाला आहे.
CP Krishna Prakash
CP Krishna Prakash Sarkarnama

पुणे : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad) माजी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांनी वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून २०० कोटी रुपयांची वसुली केल्याचे पत्र नुकतेच व्हायरल झाले होते. त्यानंतर फक्त पोलिस दलातच नव्हे, तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली. कृष्ण प्रकाश यांचे रिडर म्हणून काम केलेले एपीआय डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाने व सहीने हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठवण्यात आलेले होते. पण काही वेळातच हे पत्र बनावट असल्याचा खुलासा स्वत: डोंगरे यांनी केला. तर, रात्री उशिरा स्वतः कृष्णप्रकाश यांनीही हे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचे स्पष्ट केले.

CP Krishna Prakash
IPS कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात पत्र व्हायरल : दोनशे कोटींची वसुली केल्याचा दावा

मात्र अशातच पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही पत्र लिहुन या आरोपांना दुजोरा दिला. त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्याभोवती संशयाचे वादळ निर्माण झाले आहे. यानंतर कृष्णप्रकाश यांची संपत्ती नेमकी किती असा सवाल विचारला जात आहे.

CP Krishna Prakash
कृष्णप्रकाश यांची बदली होताच आमदार अण्णा बनसोडे यांनाही कंठ फुटला!

किती आहे कृष्ण प्रकाश यांची संपत्ती :

मुळगावी घर आणि शेकडो एकर जमीन :

  • झारखंड, हजारीबाग - घर - वडिलांच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग - शेत जमीन - वडिलांच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग - २९ एकर जमीन - परंपरागत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग - ३.७९ एकर जमीन - आईच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग - शेत जमीन - (सध्याची किंमत ३० लाख रुपये)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - ४९ एकर जमीन - परंपरागत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - ४.५ एकर जमीन - वडिलांच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - ७ एकर जमीन - स्वतः आणि भावाच्या भागीदारीत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - ८ एकर जमीन - स्वतः आणि भावाच्या भागीदारीत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - ११ एकर जमीन - स्वतः आणि भावाच्या भागीदारीत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • झारखंड, हजारीबाग, कोरंबे - २१ एकर जमीन - स्वतः आणि भावाच्या भागीदारीत - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

महाराष्ट्रात जमीन आणि ३ फ्लॅट

  • महाराष्ट्र, सांगली, कुपवाड - ४.४५ गुंठे जमीन - पत्नीच्या नावे (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, पुणे, पुरंदर, मौजे कुंभोशी गाव - २ एकर जमीन - पत्नीच्या नावे (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, पुणे, बाणेर गांव - जमीन - पत्नीच्या नावे - (सध्याची किंमत १ कोटी २० लाख)

  • महाराष्ट्र, पुणे, अमॅनोरा पार्क - फ्लॅट - पत्नीच्या नावे - (सध्याची किंमत १ कोटी १४ लाख)

  • महाराष्ट्र, पुणे, धायरी - ४ गुंठे जमीन - स्वतःच्या नावे - (सध्याची किंमत ५ लाख रुपये)

  • महाराष्ट्र, पुणे, लोहगाव - २ हजार चौरस फुटाचा फ्लॅट - स्वतःच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, मुंबई, अंधेरी - फ्लॅट - स्वतःच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, अहमदनगर, राहता खूर्द - ०.८० गुंठे जमीन - स्वतःच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, अहमदनगर, राहता खूर्द - जमीन - पत्नीच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

  • महाराष्ट्र, औरंगाबाद, गंगापूर, दहेगाव - जमीन - स्वतःच्या नावे - (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)

(माहिती संदर्भ : अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेले संपत्तीचे विवरण)

दरम्यान, या संपत्तीबाबत बोलताना कृष्ण प्रकाश यांनी ती छुपी नसून राज्य सरकारकडे जाहीर केली असल्याचे सांगितले. तसेच ती चुकीच्या मार्गाने घेतली नसून ज्ञात स्त्रोत आणि कर्जातून खरेदी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ९९ टक्के संपत्ती वडिलोपार्जित असून केवळ १ टक्का महाराष्ट्रातील मालमत्ता ही गेल्या २४ वर्षाच्या सेवाकाळात घेतल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले. याशिवाय यातील एकही प्रॉपर्टी बेनामी नसून त्या गेल्या दीड ते दोन वर्षात नाही, तर त्याअगोदर खरेदी केल्या आहेत आणि काहींसाठी कर्ज घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com