राष्ट्रवादीच्या गोटात बंडखोरीचे पीक जोमात !
Someshwar Sugar factory electionSarkarnama

राष्ट्रवादीच्या गोटात बंडखोरीचे पीक जोमात !

या प्रकाराबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या वरीष्ठांनी अद्याप कुठलीही भूमिका जाहिर केलेली नाही.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून चार दिवस उलटले तरी राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीनामा सुरूच आहे. एकीकडे बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामस्थांनी उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तर दुसरीकडे बारामती तालुक्यातीलच गडदरवाडीचे सोमनाथ मदने व चौधरवाडीचे उपसरपंच पांडुरंग दगडे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. (Insurgency in NCP due to not geting of candidature in Someshwar factory election)

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल ३५१ जणांनी उमेदवारी मागितली होती. एक जागा शेतकरी कृती समितीला, एक काँग्रेसला तर १९ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उर्वरीत कार्यकर्त्यांनी स्वतःहून अर्ज माघारी घ्यावेत. कुणाचीही मनधरणी करणार नाही. मात्र अन्यत्र संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. पवारांच्या आवाहनास प्रतिसाद देत बहुतेकांनी अर्ज काढून घेतले आहेत. मात्र, चौधरवाडीला उमेदवारीतून डावलले जाते, या भूमिकेतून बंडखोरी केली असून अर्ज माघारी न घेता अपक्ष म्हणून लढत आहे, असे पांडुरंग दगडे यांनी सांगितले.

Someshwar Sugar factory election
दोन्ही काँग्रेसने उमेदवारीत डावलेले माजी सभापती बनले बैल! : गावातून मिरवणूक काढून व्यक्त केली नाराजी

गडदरवाडीचे सोमनाथ मदने हेही स्वपक्षिय उमेदारांविरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. शेजारच्या गावात दोन दोन उमेदवार रिपीट करतात आणि आमच्यासारख्या जुन्यांना डावलतात, असे मत मांडले. राष्ट्रवादीचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनीही मांडकी-जवळार्जुन गटातून डावलल्यानंतर उमेदवारी जहीर केलेले शांताराम कापरे यांच्यावर जाहीर टिका केली होती. तर काँग्रेसचे नेते नंदकुमार जगताप यांना काँग्रेस कोट्यातून अपेक्षा होती. मात्र उपेक्षा झाल्याची भावना झाल्यावर त्यांनी काल बैलपोळ्याच्या दिवशी बैलासोबत बैल बनून गावप्रदक्षिणा घालत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान या प्रकाराबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या वरीष्ठांनी अद्याप कुठलीही भूमिका जाहिर केलेली नाही. या पक्षांतर्गत कारवायांबाबत कारवाई होणार की समजूत काढली जाणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Someshwar Sugar factory election
राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी गाठली गोविंद बाग!

वाघळवाडीतील त्या फ्लेक्सची जोरदार चर्चा

वाघळवाडीचे ग्रामस्थही कारखान्याच्या स्थापनेपासून डावलले जात असल्याच्या कारणावरून संतप्त आहेत. त्यांनी पहिल्यांदा काळ्या रंगाचा व केळाचे चिन्ह असलेला फ्लेक्स लावला. मात्र, पोलिसांनी त्वरीत काढून घेतला. यानंतर गावाने अंबामाता मंदिरात एकत्रित बैठक घेतत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच, प्रचारात वा सभेतही लोक सहभागी नाहीत. मतदानावर बहिष्कार घालत असल्याचा दुसरा फ्लेक्सदेखील जाहिरपणे लावला आहे. आता नव्या फ्लेक्सवर तर 'छोट्या मोठ्या सगळ्या नेत्यांना लाज वाटत नाही का' असा सवाल करण्यात आला आहे. यावर कार्यक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.