आमदार रोहित पवारांनी केलं गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य; बारामतीत 'पॉवरफुल' भेट

अदानी यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीत सायन्स अँड इनोव्हेशन अक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन.
आमदार रोहित पवारांनी केलं गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य; बारामतीत 'पॉवरफुल' भेट
NCP MLA Rohit Pawar Latest News, Gautam Adani Latest NewsSarkarnama

बारामती : प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गुरूवारी एकाच व्यासपीठावर होते. निमित्त होते, राजीव गांधी सायन्स अन्ड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा टॅस्टच्या वतीने बारामतीत उभारण्यात आलेल्या सायन्स अँड इनोव्हेशन अक्टिव्हिटी सेंटरच्या उदघाटनाचे. अदानी हे सहकुटुंब या कार्य़क्रमाला उपस्थित होते. अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्यही केले. (Gautam Adani Latest Marathi News)

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात हे सायन्स पार्क आहे. या कार्यक्रमानिमित्त राज्यस्तरीय विज्ञान प्रदशनाचेही आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील अनेक वैज्ञानिक प्रकल्पांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

NCP MLA Rohit Pawar Latest News, Gautam Adani Latest News
तरूणांनी इंटरसिटी एक्सप्रेस पेटवली! मोदी सरकारच्या 'अग्निपथ'ला हिंसेनं सलामी

कार्यक्रमासाठी अदानी सकाळीच बारामतीत दाखल झाले. यावेळी रोहित पवार हेही अदानींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर रोहित पवार यांनी अदानींना गाडीतून कार्यक्रमस्थळापर्यंत नेले. रोहित पवार यांनी स्वत: गाडीचे सारथ्य केल्याने चर्चा रंगली होती. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अदानी, शरद पवार, अजित पवार, राजेंद्र पवारही होते.

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर वैज्ञानिक भूमिका स्वीकारावी लागेल. भाकड समजुती, खोटेपणा या गोष्टींनी व्यक्तीचे मन तयार होत नाही आणि विज्ञानावर आधारीत ज्ञान घेऊन मानसिकता तयार करण्याची काळजी आपण घेतली तर जीवनात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. या केंद्राला तुम्ही भेट द्याल तेव्हा विज्ञानाने किती चमत्कार केले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल.

NCP MLA Rohit Pawar Latest News, Gautam Adani Latest News
काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग...! सुपरस्टार साई पल्लवीनं आगीत तेल ओतलं

आपण अनेकदा वाचतो. माणूस आता मंगळावर जातोय, चंद्रावर जातोय. चंद्र काय, मंगळ काय इथपर्यंतचा प्रवास माणूस सहज करतोय हा एक प्रचंड बदल आहे. हा बदल केवळ विज्ञानामुळे होऊ शकला. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी तयार होणे, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची भूमिका मनामध्ये तयार होणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात विज्ञानाला सोबत घेऊन पुढे यश मिळवायची भूमिका ठरवणे, हे सगळे करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पाया म्हणजे तुमची मानसिकता विज्ञानासंबंधी विकसित झाली पाहिजे, असंही पवार यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in