जगात सर्वात आर्थिक वेगाने प्रगती साधणारे राष्ट्र म्हणून भारत पुढे येतोय: निर्मला सीतारामन

Nirmala Sitaraman| एखादा निर्णयात जर कर वाढ झाली तर मोदींच्या नावाने नकारात्मक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरवला जातो.
Nirmala Sitaraman|
Nirmala Sitaraman|

इंदापूर : सर्वसामान्य, कष्टकरी यांच्या बळावर जगात सर्वात जास्त वेगाने आर्थिक प्रगती साधणारे राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण होत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले.

यावेळी बोलताना निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या, देशातील जीएसटी कौन्सिल हे फक्त केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करते असे नाही, तर देशातील प्रत्येक राज्यातील अर्थमंत्री व अर्थतज्ञ या कौन्सिलचे सभासद असतात. त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून मांडलेले मुद्दे विचारात घेऊन जीएसटी चा निर्णय घेतला जातो. निर्णय चांगला झाला तर त्यावर काही प्रतिक्रिया येत नाहीत पण एखादा निर्णयात जर कर वाढ झाली तर मोदींच्या नावाने नकारात्मक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरवला जातो. केंद्र सरकारला जबाबदार धरले जाते. मात्र या निर्णय प्रक्रियेत प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री असतात याकडे दुर्लक्ष केले जाते.

Nirmala Sitaraman|
खडसे-शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट; आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार!

याबाबत स्थानिक पातळीवर कर सल्लागार यांनी योग्य माहिती घेऊन सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. अंत्यविधीच्यासाठी लावलेला कर हे त्याचंच उदाहरण असून असा कोणताही निर्णय झालेला नसताना ही अफवा कोणी पसरवली हे विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही. याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या समन्वयातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी सितारामन यांनी उपस्थित त्यांना दिली.

Nirmala Sitaraman|
राणेंना आणि त्यांच्या मुलांना शिवसेनेनं दोन वेळा पाडलं; दानवेंनी जखमेवर मीठ चोळलं...

1) सोन्यामुळे होते रुपयाचे अवमूल्यंकन..

परकीय चलनामध्ये रुपयाचे अवमूल्यांकन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशात सोन्याला मोठी मागणी असून 90% सोने हे परदेशातून आयात करावे लागते. यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन लागते. याचा परिणाम रुपयाचे अवमूल्यनंकन होत आहे. परदेशातच कच्च्या मालाचे दर वाढल्याने आपल्या देशात खनिज तेल, खते यांची दरवाढ क्रमप्राप्त आहे. मात्र केंद्र सरकार आपल्या विविध सबसिडीच्या माध्यमातून याची झळ सर्वसामान्यांना बसू देत नाही.शेतकऱ्यांवर खते दरवाढीचा बोजा पडत नाही असाही उल्लेख यावेळी सितारामन यांनी केला.

2) आगामी दिवाळीत इंधनाचे दर कमी होणार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटत आहेत.परदेशात महागाई वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत आहेत मात्र केंद्र सरकारने जून मध्ये इंधनाचे दर कमी केले होते.आता दिवाळीतही दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपदान करीत दिवाळी सणाच्या निमित्ताने इंधनाचे दर कमी करण्याचे संकेत दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in