आंबेगाव-मंचरमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनी उडाली खळबळ

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात प्राप्तिकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे.
आंबेगाव-मंचरमध्ये प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनी उडाली खळबळ
Income Tax RaidsSarkarnama

आंबेगाव : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dlip Walse Patil) यांच्या मतदारसंघात प्राप्तिकर विभागाने (Income Tax) छापेमारी सुरु (Raids) केली आहे. मंचरमध्ये उद्योजक देवेंद्र शहा (Devendra Shah) यांच्या उद्योग-व्यवसायांसह त्यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकण्यास सुरवात केली आहे. शहा यांच्या पराग मिल्क (Parag Milk) उद्योग समूहावर ही कारवाई सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पराग मिल्क, गोवर्धन उद्योग समूहाचे दूग्ध उत्पादनात जगभरात जाळे पसरले आहे. प्राप्तिकर विभागाच्या चार पथकांकडून ही कारवाई सुरू आहे. गृहमंत्री वळसे पाटलांच्या मतदारंसघात सुरू असलेल्या या छापेमारीमुळे खळबळ उडाली आहे. अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Income Tax Raids
परमबीरसिंहांच्या जिवाला धोका असल्याचे ऐकून गृहमंत्री वळसे पाटलांना बसला धक्का!

असे पडले छापे

प्राप्तिकर विभागाने मंचर येथील पराग डेअरीवर काल रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी छापा पडला. त्यानंतर अवसरी येथील पीरसाहेब डेअरीवर आज पहाटे 3 वाजून 30 पडला. देवेंद्र शहा यांच्या निवासस्थानी सकाळी 7 वाजता छापा टाकण्यात आला. नंतर देवेंद्र शहा यांच्या मित्रावर सकाळी 9 वाजता छापा टाकण्यात आला. या छाप्यात प्राप्तिकर विभागाने अनेक कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची तपासणी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in