मोठी बातमी : केंद्रीय तपास यंत्रणा बारामतीत

बारामतीत (baramati) काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या चर्चेला उधाण आले आहे.

मोठी बातमी : केंद्रीय तपास यंत्रणा बारामतीत
sarkarnama

बारामती (पुणे) :बारामती तालुक्यातील काटेवाडी (katewadi) येथील एका व्यक्तीच्या घराची केंद्रीय यंत्रणांकडून तपासणी सुरु झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिका-यांनी ही चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बारामतीत (baramati) काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येऊन गेल्यानंतर आज लगेचच छापेमारी सुरु झाल्यानंतर याला काही राजकीय संदर्भ आहेत किंवा कसे या चर्चेला उधाण आले आहे.एमआयडीसीतील एक कंपनीतही चैाकशी सुरु असल्याचे समजते. मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.


मोठी बातमी : केंद्रीय तपास यंत्रणा बारामतीत
20 Years Of PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान, वाचा दहा उल्लेखनीय कामगिरींची नोंद

केंद्रीय यंत्रणांकडून गुरुवारी सकाळीच बारामती परिसरात शोधमोहिम सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी ही शोधमोहिम कशासाठी सुरु आहे हेही निष्पन्न झालेले नाही. एका खासगी साखर कारखान्याशी संबंधित एका पदाधिका-याच्या घराबाहेरही हे अधिकारी ठाण मांडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी या बाबत नेमका खुलासा झालेला नाही.

Related Stories

No stories found.