आयकर विभागाचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच

जरंडेश्वर साखर कारखान्यावर सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची (Income Tax Department) छापेमारी सुरूच आहे.

आयकर विभागाचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच
sarkarnama

पुणे : आयकर विभागाची राज्यातील साखर कारखान्यांवर काल छापेमारी केली होती. आज दुसऱ्या दिवशीही ही छापेमारी सुरुच आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत आयकर विभागाकडे तक्रार केली होती.

जरंडेश्वर साखर कारखान्यावर सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची (Income Tax Department) छापेमारी सुरूच आहे. कारखान्याच्या कागदपत्रांची आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. तर नंदुरबार येथे सलग दुसऱ्या दिवशी आयान मल्टीट्रेड कंपनीवर आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. आज सकाळपासूनच कारखान्याच्या आवारात सीआरपीएफचे जवान तैनात आहेत.


आयकर विभागाचे धाडसत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच
फडणवीसांनी गाजर वाटले, आम्ही चाव्या वाटतोय ; ठाकरेंचा हल्लाबोल

नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथे स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर कालपासून आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. काल बारा तासांच्या चौकशीनंतर सूत्रांच्या माहितीनुसार आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई सुरूच राहणार आहे. आज सकाळपासूनच कारखान्याच्या आवारात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून कामगारां व्यतिरिक्त कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत अस्पष्टता आहे.

दौंड शुगर ,आंबालिका शुगर , जरंडेश्वर साखर (jarandeshwar sugar mill), पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचे समजते. दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड (daund sugar) या खासगी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर प्राप्तीकर विभागाने शोध मोहिम सुरू केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या साखर कारखान्याचे मार्गदर्शक आहेत. आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर लिमिटेड या खासगी कारखान्याच्या कार्यालयात काल सकाळी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. प्राप्तीकर विभागाचे विविध पथक कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करीत आहेत.

Related Stories

No stories found.