अजितदादा म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन, 'ढगात गोळ्या मारु नका'

अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी, शिवालिक ग्रुप, चोराडिया, डीबी रियालिटी अशा काही ठिकाणी आयकर विभागाची (Income Tax Department) छापेमारी सुरु आहे.अजितदादा म्हणाले, ''पाहुण्यांचे काम सुरु आहे, ते गेल्यावर बोलेन, 'ढगात गोळ्या मारु नका'
ajit pawarsarkarnama

मावळ (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी, शिवालिक ग्रुप, चोराडिया, डीबी रियालिटी अशा काही ठिकाणी आयकर विभागाची (Income Tax Department) छापेमारी सुरु आहे, याबाबत आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ''ढगाळ गोळ्या मारु नका,'' असे अजित पवार म्हणाले. पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात मत्स्यव्यवसायाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ''कालच्या बद्दल मी सांगितलेलं आहे. सारखं सारखं मी सांगायची गरज नाही. एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल.'' अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाचे छापेमारी आजही सुरु आहे.

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याचे समजते. अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने काल छापे टाकले. यानंतर अजित पवार यांनी सांगितले,''सत्तेचा गैरवापर आम्ही कधी केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं,''

ajit pawar
फडणवीसांनी गाजर वाटले, आम्ही चाव्या वाटतोय ; ठाकरेंचा हल्लाबोल

''आयकर विभागाने कुठे छापेमारी टाकावी हा त्यांचा अधिकार आहे. मी सर्व टॅक्स भरतो. राजकीय हेतूने ही कारवाई आहे. यात काय सापडलं हे तेच सांगतील. सत्तेचा गैरवापर कधी आम्ही केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं. माझ्या बहिणी ज्यांचे 35 वर्षांपूर्वी लग्न झाली आहेत. त्यातील एका बहिणीचा कोल्हापूर येथील कारखान्यावर तर पुण्याच्या बहिणीच्या दोन कारखान्यावर का धाडी टाकल्या ? असा सवाल अजित पवारांनी काल उपस्थित केला होता.

Related Stories

No stories found.