मेट्रोची सवय लावून घ्या ; मोदींनी केलं पुणेकरांना आवाहन

मोदींनी गरवारे कॅालेज ते वनाज असा मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते झाले.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर मोदींच्या (Narendra Modi)हस्ते पुणे मेट्रोचे (Pune Metro)उद्धघाटन झाले. मोदींनी गरवारे कॅालेज ते वनाज असा मेट्रोने प्रवास केला. पिंपरी ते फुगेवाडी या मेट्रोचे उद्धघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा झाली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापैार मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, रामदास आठवले, प्रवीण दरेकर, चंद्रकात पाटील, गिरीश बापट, सुभाष देसाई, प्रकाश जावडेकर , माई ढोरे उपस्थित होते. मोदींनी भाषणाला मराठीत सुरवात केली. यावेळी महाराष्ट्रातील स्वातंत्रसैनिक, महामानव यांना मोदींनी अभिवादन केले.

''महाराष्ट्रात मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणेकरांना आज इलेट्रॅानिक बस, मेट्रो मिळाली. मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी,'' असे आवाहन मोदींनी यावेळी केले.

''पुण्याला सुंदर , स्वच्छ करण्यासाठी पुणे महापालिकेने अनेक कामे सुरु केली आहेत. केंद्र सरकार त्यांना मदत करीत आहेत. पुण्यात नदी उत्सवाचे आयोजन करण्यात यावे, त्यामुळे नदीचे महत्व नागरिकांना समजेल,'' असे मोदीं म्हणाले.

मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्तविक केले. ''आमचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण झाले,'' असे मोहोळ म्हणाले. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे यावेळी भाषण झाले. ''पुण्यात मेट्रोचा विस्तार करा. नव्या मार्गाना मान्यता द्या,'' अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. विकासकामात राजकारण आणू नका, असे पवार म्हणाले.

''अलीकडे काही सन्मानीय व्यक्तीकडून महामानवांविषयी चुकीची विधाने करीत आहेत,'' असे सांगत अजित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना टोमणा लगावला.

शहर कॉग्रेस पक्षाच्यावतीने टिळक चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी रमेश बागवे, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, रविंद्र धंगेकर, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते. 'नरेंद्र मोदी गो बैक"च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Narendra Modi
#GoBackModi:युक्रेनमध्ये मुलांना मृत्यूच्या दाढेत सोडून मोदी प्रचार करताहेत!

''छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच जनतेचे रक्षण हाच आपला धर्म मानला आहे. मोदी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशांच्या मुलांना मृत्यूच्या दारेत सोडून पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. यामुळे पुणे शहर मोदीचा स्वागत #GoBackModiने करत आहे,'' असे टि्वट पटोलेंनी केलं आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने (ncp)उपहासात्मक फलक लावून मोदींच्या दैाऱ्याची खिल्ली उडवली आहे.

''मोदीजी आले, मोदीजी आले, अरे हो इलेक्शन आले..'' अशा आशयाच्या फलक राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा पुणे दैारा असल्याचे नकळत राष्ट्रवादीने या फलकाच्या माध्यमातून सांगितले आहे. समाज माध्यमांवर या फलकाची चर्चा रंगली आहे. (Inauguration of Pune Metro pm Narendra Modi)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in