पुण्यातील 48 जागा ओबीसींसाठी असणार; सप्टेंबर संपताच निवडणुकीचा धुरळा

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे
pune municipal corporation
pune municipal corporation sarkarnama

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसी समाजाचे (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कायम ठेवल्याने या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील ४७ जागा कमी होणार आहेत. या प्रवर्गात आता पुन्हा महिला आरक्षण, तसेच उमेदवारी मिळविण्यापर्यंतची स्पर्धा आणखीन तीव्र झाल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राजकीय पेच निर्माण झाला होता. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने वेळेत निवडणुका घ्या असे आदेश दिलेले असल्याने ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका होतात की काय स्थिती निर्माण झाली होती. न्यायालयाच्याच आदेशानुसार अंतिम प्रभाग रचना जाहीर करून त्यावर अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षणही निश्‍चित करण्यात आले होते.

pune municipal corporation
ओबीसी आरक्षण : उद्धव ठाकरे यांची संयत प्रतिक्रिया... मी मुख्यमंत्री नसलो तरी...

पुण्यात (PUNE) १७३ पैकी २३ जागा अनुसूचित जाती तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत झाल्या. त्यामुळे उर्वरित १४८ जागा या खुल्या प्रवर्गासाठी होत्या. ओबीसी आरक्षण मिळाले नाही तर आम्ही २७ टक्के जागांवर ओबीसी उमेदवार देऊ, असे सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केले होते. मात्र, याची सक्ती नसल्याने खुल्या गटातील अनेक इच्छुकांना नगरसेवक होण्याची संधी मिळाल्याने ते देखील तयारीला लागले होते.

ओबीसी आरक्षण कायम राहिल्याने खुल्या गटातील थेट ४७ जागा कमी झाल्या होत्या. त्याचा धक्का खुल्या प्रवर्गाला बसला आहे. त्यामुळे तयारीला लागलेल्या उमेदवारांचे लक्ष पुन्हा आरक्षण सोडतीमध्ये लागले आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणाची सोडत काढल्यानंतर खुल्या गटाचे प्रभाग कोणते, यातील महिलांसाठीच्या आरक्षीत कोणते हे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर अनेक इच्छुकांनी स्वतःसह घरातील महिला उमेदवार असावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, ओबीसी आरक्षणाची सोडत काढताना ओबीसी महिलांचे २४ आणि खुल्या प्रवर्गातील महिलांच्या ५० जागा ही निश्‍चीत होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे. ओबीसी समाजाला उमेदवारीसाठी खुल्या गटाशी झगडावे लागणार होते. मात्र, आता आरक्षण कायम राहिल्याने ओबीसी उमेदवारांना दिलासा मिळाला असून, हक्काच्या ४७ जागा आरक्षीत झाल्या आहेत.

pune municipal corporation
धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

अशा असतील राखीव जागा (कंसात महिलांसाठी आरक्षीत)

एकूण जागा - १७३ ( ८७)

अनुसूचित जातीसाठी आरक्षीत - २३ (१२)

अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत - २ (१)

ओबीसीसाठी - ४८ (२४)

खुल्या प्रवर्गासाठी - १०१ (५०)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com