Khed Bazar Samiti News: खेड बाजार समितीत पुन्हा आ.मोहितेंचीच बाजी, लिंभोरे सभापती,तर वनघरे उपसभापती

Pune Politics| खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज (२४ मे) निवडणूक प्रक्रिया पार पडली
Khed  Krushi Utpanna
Bazar Samiti
Khed Krushi Utpanna Bazar SamitiSarkarnama

Khed Bazar Samiti : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज (२४ मे) निवडणूक प्रक्रिया पार पडली. अपेक्षेनुसार राष्ट्रावादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलने पुन्हा बाजी मारली. विरोधी भाजप, काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना अशा सर्वपक्षीय भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलचा पुन्हा दणदणीत पराभव केला. (NCP) (In the Khed Bazar Committee, Kailas Limbhore is the chairman, while Vitthal Vanghare is the deputy chairman)

Khed  Krushi Utpanna
Bazar Samiti
Maval BJP News : मावळात भाजपचा सूज्ञपणा; बाजार समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत घेतला 'हा' निर्णय

गेल्या महिन्यात २८ तारखेला झालेल्या खेड बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आ. मोहितेंच्या पॅनेलने १८ पैकी दहा जागा जिंकल्या, तर प्रतिस्पर्धी पॅनेलला सहा जागांवर समाधान मानावे लागले होते. एकेक अपक्ष दोन्ही पॅनेलला नंतर मिळाल्याने ११-७ असे संख्याबळ झाले होते.आ.मोहितेंच्या (MLA Dilip Mohite Patil) पॅनेलकडे बहूमत असल्याने आजची सभापती,उपसभापतीची निवडणूक बिनविरोध होईल,असा अंदाज होता.

प्रतिस्पर्धी पॅनेलने विजय शिंदे आणि सुधीर भोमाळे हे उमेदवार दिले. त्यामुळे मतदान झाले. आ. मोहितेंचे सभापती आणि उपसभापतीपदाचे उमेदवार कैलास लिंभोरे आणि विठ्ठल वनघरे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा ११-७ असा पराभव केला. त्यातून बाजार समितीत आ. मोहितेंची सत्ता कायम राहिली. तिथे परिवर्तन घडविण्याचा सर्वपक्षीयांच्या परिवर्तन पॅनेलचा प्रयत्न फसला. निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे आ. मोहितेंनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन सरसमकर यांनी काम पाहिले. अनुचित प्रकार होण्याची शक्यता ध्यानात घेऊन ही निवडणूक होत असलेल्या मार्केट यार्ड आवारात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (Khed Bazar Samiti)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in