सोमय्या म्हणाले;हसन मुश्रिफांच्या प्रकरणात वळसे-पाटलांनी केले ‘पोलिटिकल सेटींग’

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्य मंत्रीमंडळातील दोन मंत्री व काही नेते अकलेले आहेत.
सोमय्या म्हणाले;हसन मुश्रिफांच्या प्रकरणात वळसे-पाटलांनी केले ‘पोलिटिकल सेटींग’
Kirit SomaiyaSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची तक्रार कोल्हापूरच्या मुरगुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.नियमाप्रमाणे या प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलीस ठाण्यात करायला हवी होती. मात्र, हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘पोलिटिकल सेटींग’ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात केला.

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी केंद्र सरकारच्या निधीतून असलेल्या पंधराशे कोटी रूपयांच्या योजनेत मुश्रिफ यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण एसीबीके सोपवून वळसे-पाटील यांनी पोलिटिकल सेटींग केले आहे. तरीही या प्रकरणी एसीबी आधिकाऱ्यांके उपस्थित राहून तक्रार देत जबाब नोंदवल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Kirit Somaiya
हाथरसच्या घटनेवर अश्रू ढाळले; पुण्यातल्या घटनेवर का नाही : चित्रा वाघांचा प्रियंकांना सवाल

ग्रामविका मंत्री मुश्रिफ यांच्यासंदर्भात एकुण तीन तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील दोन तक्रारी मुश्रिफ व त्यांचे जावई यांच्या विरोधात साखर कारखान्या संदर्भात आहे. या प्रकरणात शंभर कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तिसरी तक्रार ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेतील भ्रष्टाचारासंदर्भात आहे. या तीन्ही तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Kirit Somaiya
चित्रा वाघ म्हणाल्या;सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्य मंत्रीमंडळातील दोन मंत्री व काही नेते अकलेले आहेत. त्याची माहिती गोळा करण्यात काम सरू असून लवकरच ती माहितीदेखील समोर येईल,असे सोमय्या यांनी सांगितले.आजच्या दौऱ्यात सोमय्या यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांचीही भेट घेतली. यानंतर कसबा, खडकवासला या मतदासंघातील कार्यकर्त्यांशी संवादाचा कार्यक्रम पक्षाच्यावतीने ठेवण्यात आला होता.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.