Pimpri-Chinchwad : धोरणात्मक निर्णयाअभावी प्रदीप जांभळे नामधारी आयुक्त ठरणार

Pimpri-Chinchwad : प्रशासक राजवटीतही 'अभ्यास' दौरे सुरुच; आयुक्तांसह चौघे गेले दुबईला
Pimpri-chinchwad News
Pimpri-chinchwad NewsSarkarnama

पिंपरी : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोध डावलून पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह हे भारतातील सिटी सेंटर पाहायचे सोडून दुबईतील सिटी सेंटर पाहण्यासाठी आपल्या तीन अधिकाऱ्यांसह रविवारी (ता.१५) रात्री आठवडाभराच्या परदेश 'अभ्यास' दौऱ्यासाठी रवाना झाले.

आयुक्तांच्या अनुपस्थितीत (१६ ते २२ जानेवारी) आयुक्तपदाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त (एक) प्रदीप जांभळे-पाटील हे पाहणार आहेत. मात्र, औटघटकेचे आय़ुक्त जांभळे हे नामधारी आय़ुक्तच ठरणार आहे. कारण त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास आय़ुक्तांनी मज्जाव केला आहे.

Pimpri-chinchwad News
Tukaram Munday News : वनवास कधी संपणार; तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!

फक्त राजकीय शिष्टाचार (मंत्री व लोकप्रतिनिधींचे स्वागत) आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक महत्वाच्या बाबींचे कामकाज पाहण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. तसेच आठवडाभरातल्या निर्णयाचा अहवाल त्यांना दौऱ्यावरून परत आल्यावर आय़ुक्तांना सादर करावयाचा आहे. आयुक्त हे आपल्या अनुपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार मर्जीतील जांभळे यांच्याकडे सोपविण्याची शक्यता `सरकारनामा`ने कालच दिलेल्या बातमीत व्यक्त केली होती. ती खरी ठरली.

Pimpri-chinchwad News
Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

दुसरीकडे या दौऱ्याची मोठी गुप्तता पाळल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले. महापालिकेच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला या दौऱ्याबाबत स्पष्ट व नेमकी माहिती आजही सांगता आली नाही. तो खासगी आहे की सरकारी हे सुद्धा ते ठामपणे सांगू शकले नाही.

सिटी सेंटर प्रकल्पासाठी दोन कोटी नऊ लाख रुपये फी मोजलेली सल्लागार कंपनी `केपीएमजी`ने हा दुबई दौरा प्रायोजित केल्याची चर्चा होती. मात्र, तो पालिकेचा म्हणजे जनतेच्या कररुपी पैशातून होणार असल्याचे आज समजले. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम आणि कार्यकारी अभियंता तथा स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरिष पोरेड्डी हे या दौऱ्यावर गेले आहेत.

Pimpri-chinchwad News
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या 'रोड शो'द्वारे भाजपची ‘वातावरण निर्मिती‘!

त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने (Uddhav Balasaheb Thackeray) विरोध केला होता. पालिकेच्या खर्चाने दौरे करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी लोकांच्या मूलभूत समस्यांकडे आयुक्त व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, या शब्दांत या शिवसेनेचे शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी (ता.१४) या दौऱ्याला विरोध केला होता.

तसेच यापुढे जनतेच्या पैशाने असे दौरे केल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. शहरात दररोज पाणीपुरवठा केला जात नाही, रस्ते खोदून ठेवले आहेत. शहराची कचराकुंडी झाली आहे. याकडे लक्ष देण्याऐवजी आयुक्त व अधिकारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com