चक्क ग्रामपंचायत सदस्यानेच घेतले अफूचे पीक!

या बोंडापासून लाखो रूपयांची अफू तयार करण्याचा मानस असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले आहे.
opium crop
opium cropSarkarnama

सासवड शहर (जि. पुणे) : पुरंदर (Purandar) तालुक्यातील यादववाडी-सटलवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य भुजंग काशिनाथ यादव आणि महेश काशिनाथ यादव यांनी आपल्या शेतात अफूचे पीक घेतल्याचे आढळून आले. सासवड पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रुपयांचे ५० किलो अफूची झाडे आणि बोंडे जप्त केली आहेत. पोलिसांच्या छापेमारीमुळे पुरंदर तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे. (In Purandar Gram Panchayat member took a opium crop)

opium crop
आमदार संजय शिंदे अध्यक्ष असताना झेडपीत ‘रात्रीस खेळ चाले’

पुरंदर तालुक्यातील यादववाडी येथील गट क्रमांक १६८१ मध्ये अफूची शेती करत असल्याची माहिती सासवड पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी यादववाडी-सटलवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य भुजंग काशिनाथ यादव (वय ४९) आणि महेश काशिनाथ यादव (वय ४६) यांच्या शेतात छाटा टाकला. त्यावेळी पोलिसांना अंदाजे ५० किलो वजनाची अफूची झाडे व बोंडे मिळाली. या बोंडापासून लाखो रूपयांची अफू तयार करण्याचा मानस असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून ती जप्त केली आहेत.

opium crop
प्रदेशाध्यक्षांचा दौरा चार तासांचा अन्‌ नियोजनासाठी बारा समित्या!

दरम्यान, खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज नागरे, प्रतीक धिवार, विक्रम भोर, पोपट यादव, अनिल खोमणे, गणेश पोटे, नीलेश जाधव, सुभाष लाटणे, जब्बार सय्यद यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक घोलप हे स्वतः या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com