पुण्यात रूग्णवाढीचा दर तीन दिवसाला दुप्पट : एका दिवसात अकराशे पॉझिटिव्ह

पुण्यातील वेगाने वाढणारी रूग्णसंख्या काळजी वाढविणारी आहे.
Corona

Corona

Sarkarnama

पुणे : पुण्यात आज दिवसभरात तब्बल एक हजार १०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात जेमतेम सातशेवर असलेली ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या आज चार हजाराच्या घरात पोचली आहे.पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कोरोना स्थितीचा आढावा घेत आठवीपर्यंतच्या शाळा बंद (School Closed) करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्यात रूग्णवाढीचा दर तीन दिवसांनी दुप्पट होत आहे. रूग्णवाढीचा हा दर असाच कायम राहिला तर पुणेकरांना आणखी कडक निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
ओमिक्राॅनचा धसका पुण्यात : आठवीपर्यंतच्या शाळा तातडीने बंद, मास्क नसेल तर मोठा दंड

पुण्यातील वेगाने वाढणारी रूग्णसंख्या काळजी वाढविणारी आहे. रूग्ण वाढीचा दर तीन दिवसाला दुप्पट असून यात वाढ होण्याची शक्यता आहे.आज दिवसभरात पुण्यात सहा हजार ८१९ जणांची चाचणी करण्यात आली. यात एक हजार १०४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.पुण्यातील एकुण ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या तीन हजार ७९० वर पोचली आहे.

<div class="paragraphs"><p>Corona</p></div>
भुजबळ म्हणाले; राज्यपालांना निमंत्रण देण्यास आमच्याकडूनच उशीर झाला

मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मास्क नसेल तर पाचशे रूपये दंड करण्यात येणार आहे. रस्त्यावर थुंकल्यास एक हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. सध्या वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वापरण्यात येत आहेत. कपड्यावरील मॅचिंगनुसार मास्क वापरण्याची ‘फॅशन’आली आहे. मात्र, या प्रकारचे मास्क सुरक्षित नाहीत. त्यामुळे सर्जिकल मास्क किंवा ‘एन-९५’ प्रमाणित मास्क वापरण्याचा सल्ला पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी बाजारात व रस्त्यावर गर्दी केली जात आहे.अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.कोरोनाचे नियम पाळणे सर्वांच्या हिताचे आहे. नियम न पाळल्यास आणखी कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

हॉटेल, मॉल, सिनेमागृह या सार्वजनिक ठिकाणी दोन लस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याने दोन्ही लस घेतल्याचे डिजीटल प्रमाणपत्र प्रत्येकाला सोबत ठेवावे लागणार नाही. तपासणी केली तर हे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com