पुण्यात रेल्वे इंजिनाला हवीय कमळाची साथ !

पुणे महापालिकेत प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा निर्णय बुधवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत अंतीम होणार असला तरी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टीशी युती करायला इच्छुक आहे.
MNS-BJP
MNS-BJPSarkarnama

पुणे : पुणे महापालिकेत प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा निर्णय बुधवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत अंतीम होणार असला तरी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टीशी युती करायला इच्छुक आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परवानगी दिली तर शहर पातळीवर आमची तयारी आहे, असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आज सांगितले.

पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी तीन सदस्यांचा प्रभाग झाला तर आपल्याला कसा प्रतिसाद मिळेल अशी विचारणा केल्यानंतर भाजपासोबत जाण्याची तयारी आपण दाखवली आहे, असे मोरे यांनी सांगितले. आमची ही भूमिका स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून असली तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील तोच निणय अंतीम असेल, असे शहराध्यक्ष मोरे यांनी स्पष्ट केले.

MNS-BJP
शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ओतले सोयाबीन

पुण्याची सत्ता हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सज्ज झाली आहे. मात्र, या परिस्थितीत भाजपाने मनसेला सोबत घेतले तर राष्ट्रवादीला सत्तेत येण्यापासून रोखता येणार आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर २०१२ च्या पहिल्या निवडणुकीत मनसेचे २९ जागा जिंकत विरोधी पक्षनेतेपदावर उडी घेतली होती. मात्र, २०१७ निवडणुकीत पक्षाचे पुरते पानिपत झाले. पक्षाचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. पक्षाचा मतदार आजही टिकून आहे. केवळ चार सदस्यीय प्रभागामुळे मनसेचे नुकसान झाल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष मोरे यांनी सांगितले.

‘सरकारनामा’शी बोलताना मोरे यांनी गेल्या दोन निवडणुकांचे विश्‍लेषण केले. ते म्हणाले, ‘‘ २०१२ च्या निवडणुकीत दोन सदस्यांचा प्रभाग होता. एक वा दोन सदस्यांचा प्रभाग असेल तर आम्हाला फारशी अडचण येत नाही. दोन किंवा तीनच्या प्रभागात आमची ताकद कमी पडते. यावेळी दोन सदस्यांचा प्रभाग अंतीम होईल. मात्र, तीन सदस्यांचा प्रभाग झाला तर भाजपासोबत जाऊन महापालिकेत मोठे यश मिळू शकते.’’

MNS-BJP
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी 15 ऑक्टोबरची मुदत

मोरे म्हणाले, ‘‘ कसबा, कोथरूड व हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघात आमची चांगली ताकद आहे. या तीन मतदारसंघात १८ ते २२ ठिकाणी आम्ही चांगली लढत देऊन विजयी होऊ शकतो. गेल्यावेळी चार सदस्यांचा प्रभाग होता. भाजपाची हवा होती. तरीही १८ ठिकाणी आमच्या उमेदवारांनी सहा ते १४ हजारांदरम्यान मते मिळाली होती. स्वतंत्र लढलो तर किमान ४० ते ५० ठिकाणी आम्ही भाजपाचे नुकसान करू शकतो.’’

एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग असेल तर मनसेला चांगले यश मिळू शकते. शिवसेना सध्या राज्यात सत्तेत असली तरी पुण्यात मनसेची ताकद शिवसेनेपेक्षा अधिक आहे. महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक अधिक दिसत असले तरी मनसेच्या उमेदवारांचे एकुण मतदान शिवसेनेपेक्षा अधिक आहे. या पाश्‍र्वभूमीवर स्थानिक नेत्यांची इच्छा असली तरी भाजपाचे नेते आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनात काय आहे यावरच अंतीम निर्णय अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com