पुण्यात कोरोनाचा कहर : दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी

राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी रात्री नवीन नियमांबाबत आदेश जारी केले.
Corona
CoronaSarkarnama

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सोमवारपासून (ता.१०) पुण्यात रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew in Pune) लागू करण्यात येणार आहे. तर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Corona
सरकारनामा आपल्या वॉर्डात : बाणेर टॅकरमुक्त दाखवा अन्‌ पाच लाख रूपये मिळवा !

पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे आता दिवसा पाचपेक्षा जास्त नागरीकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे, तर रात्री संचारबंदीमुळे नागरीकांना विनाकारण फिरता येणार नाही.

Corona
‘आमचं नवीन ठरलंय’ : संजय मंडलिकांच्या घोषणेने सतेज पाटलांना इशारा

राज्य सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी रात्री नवीन नियमांबाबत आदेश जारी केले. त्यानुसार पुणे पोलिसांनी रविवारी नवीन नियमांबाबतचे आदेश काढले आहेत.या आदेशाची सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे.डॉ. शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार १० जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज रात्री ११ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.

या कालावधीमध्ये नागरीकांना ठोस कारण असल्याशिवाय फिरता येणार नाही. तसेच पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. त्यामध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.संबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ तसेच साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदी शिक्षा शिक्षा होऊ शकते.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com