पिंपरी-चिंचवड 'मनसे'ची भोंग्यावर झाकली मूठ...

राज्यभरातील तब्बल १३ हजार मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे.
पिंपरी-चिंचवड 'मनसे'ची भोंग्यावर झाकली मूठ...
MNSsarkarnama

पिंपरी : मशिदीत भोंगा वाजला, तर ४ मे पासून दुप्पट आवाजात हनुमानचालिसा लावण्याचा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्यानंतर राज्यभरातील तब्बल १३ हजार मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) चाळीसेकजण आहेत. काल व आजही त्यांना पोलिस ठाण्यावर बोलावून या नोटीसा बजावल्या जात आहेत.

MNS
मोठी बातमी : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; 16 पैकी 12 अटींचे केलं उल्लंघन

मनसेचे शहराध्यक्ष व पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक सचिन चिखले (Sachin Chikhale) यांना निगडी पोलिसांनी सकाळी दहा वाजता पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४९ ची नोटीस बजावली. बारा वाजेपर्यंत त्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. आपण वा आपल्या संघटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास आपल्यास जबाबदार धरून या कायद्यान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा चिखले व त्यांच्या सहकाऱ्यांना बजावण्यास कालपासून शहर पोलिसांनी सुरुवात केली आहे. काय, कुठे आंदोलन करणार आहे, याचा कानोसा या पदाधिकाऱ्यांकडून पोलिस घेत आहेत. तसेच त्यांच्या सह्या नोटीसांवर घेऊन त्याचे फोटोही पोलिसांकडून काढले जात आहेत.

MNS
मनसेविरुद्ध पोलिस राज्यभर आक्रमक : १५ हजार जणांवर कारवाई, १३ हजार नोटीस

दरम्यान, अक्षय तृतीयेनिमित्त आज शहरातील अनेक मंदिरात व त्यातही हनुमानाच्या देवळांत मनसेने आरतीचे नियोजन केले होते. त्यासाठी फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. मात्र, काल राज ठाकरे यांनी ऐनवेळी रमजान ईदच्या सणात बाधा नको म्हणून ही आरती रद्द केली. परिणामी शहर मनसेचेही त्यासाठीची तयारी वाया गेली. मात्र, पोलिसांनी त्यामुळे सुटकेचा निश्वास सोडला. उद्यापासून लाऊडस्पिकर लागणाऱ्या मशिदींसमोर हनुमानचालिसा लावण्याचे राज ठाकरे यांचा आदेश कायम असल्याने पोलिसांची चिंता मिटलेली नाही. पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन केले जाईल, बोलण्यापेक्षा...असा सूचक इशारा चिखले यांनी शहरात मशिदींसमोर हनुमानचालिसा लावणार का या प्रश्नाच्या उत्तरात 'सरकारनामा'शी बोलताना दिला. मात्र, एकंदर परिस्थिती पाहता शहरात उद्यापासून भोंग्यावर हनुमानचालिसा वाजेल वा लागेल, असे सध्या, तरी दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.